Big B अमिताभनं 37 वर्षांमध्ये पहिल्यांदाच रद्द केली ‘संडे फॅन्स मीट’, ट्विट करत म्हणाले- ‘प्लिज इथं येऊ नका’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता अनेक बॉलिवूड स्टार्स आपले दौरे आणि शो रद्द करताना दिसत आहेत. बिग बी अमिताभ बच्चन सोबतही असंच काहीसं झालं आहे. बिग बी अमिताभ यांना आपल्या चाहत्यांसोबतची साप्ताहिक मीटींग रविवारी रद्द करावी लागली आहे. 77 वर्षीय अभिनेता अमिताभ बच्चन जुहूमधील आपलं निवास जलसा येथे गेल्या 37 वर्षांपासून प्रत्येक रविवारी चाहत्यांसोबत मीटींग करत असतात.

बिग बी यांनी आपली मीटींग रद्द झाल्याचं सांगत एक ट्विट केलं आहे. बिग बी म्हणतात, “सर्व शुभचिंतकांना नम्र विनंती आहे की, जलसाच्या गेटवर येऊ नये. रविवारी मी भेटण्यासाठी येणार नाही. खबरदारी घ्या. सुरक्षित रहा” असं म्हणत त्यांनी चाहत्यांना कोरोनापासून बचाव करण्यासाठीही सांगितलं आहे.

बिग बी पुढे म्हणाले आहेत की, “जलसावर रविवार दर्शन रद्द झालं आहे. कृपया कोणीही तेथे आज सायंकाळी एकत्र जमू नये.” बिग बी अमिताभ यांचं हे ट्विट नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनेक चाहत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत, कमेंट केल्या आहेत. काही चाहत्यांनी त्यांचं हे ट्विट लाईक आणि शेअर करत इतरांपर्यंत पोहोचवलं आहे.

अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर याच वर्षात अमिताभ बच्चन अनेक सिनेमांमध्ये दिसणार आहेत. यामध्ये ब्रह्मास्त्र, झुंड, चेहरे, गुलाबो सिताबो अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. यापैकी झुंड सिनेमाचा टीजर रिलीज झाला आहे. नागराज मंजुळे या सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. नागपूरमध्ये सिनेमाची शुटींग झाली आहे.