बारामतीत आणखी 7 दिवसांचा कडक Lockdown जाहीर

बारामती: पोलीसनामा ऑनलाइन – दुकाने बंद ठेवूनही बारामती शहर आणि तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. त्यामुळे प्रशासनाने 7 दिवसापूर्वी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये आणखी 7 दिवसांची वाढ केली आहे. यापूर्वी लागू केलेल्या कडक लॉकडाऊनची मुदत काल संपली. त्यानुसार 11 ते 18 मे रोजी रात्री 12 वाजेपर्यंत लॉकडाऊन वाढवला असून निर्बंध पूर्वीप्रमाणेच लागू राहणार आहेत.

बारामती शहरासह तालुक्यातील हॉस्पिटल, दवाखाने व औषध विक्रीची दुकाने वगळून सर्व आस्थापना, दुकाने पुढील 7 दिवस बंद राहणार आहेत. फक्त दूध विक्री सकाळी 7 ते 9 पर्यंत सुरू राहील तसेच अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंत घरपोच सेवा चालू राहील असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समिती सभापती नीता फरांदे, रोहित कोकरे, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी किरणराज यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पोलीस निरीक्षक बारामती शहर नामदेव शिंदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आदी उपस्थित होते,