Coronavirus : घरात ‘एन्ट्री’ करताना लक्षात ठेवा ‘या’ 8 गोष्टी, ‘कोरोना’ला हरवेल तुमची ‘समजदारी’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे लॉकडाऊननंतरही काही लोकांना मजबुरीने घराबाहेर जावे लागत आहे. पोलीस कर्मचारी, सफाई कर्मचारी, डॉक्टर यांच्यासह इतर व्यावसायिकांना सामान खरेदी करण्यासाठी घराबाहेर जावे लागत आहे. अशा लोकांनी घरात जाताना सावधगिरी बाळगली पाहिजे.

जाणून घ्या घरात जाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत –

१. घरात जाताना चप्पल घराच्या बाहेरच काढावी. बाहेर जी चप्पल घालून जाता त्यासाठीही एक सुरक्षित जागा बनवा.
२. घरात जाताच कोणत्याही वस्तूला हात लावू नका. एवढेच नाही तर बाहेर असलेल्या डोअर बेलला देखील टूथपिकच्या मदतीने प्रेस करा.
३. घरी आल्यानंतर कारची चावी, पर्स किंवा बॅग सारख्या गोष्टी सुरक्षित जागेवर ठेवा, जिथे त्यांना कोणी हात लावणार नाही.
४. यानंतर खिशातून आपला स्मार्टफोन काढा आणि त्याच्या बॉडी आणि ग्लासला सॅनिटाइज केल्यानंतर एखाद्या सुरक्षित ठिकाणी ठेवून द्या.
५. बाहेरून आल्यावर अंगावर असलेले कपडे वॉशिंग मशीन किंवा बॅगेत सांभाळून ठेवा, जेणेकरून ते मुलांच्या हाताला लागणार नाहीत.
६. बाहेरून आणलेल्या सामानाला चांगले सॅनिटाइज करून घ्या. भाज्या असतील तर त्या धुऊन घ्या. जर काही सामान असेल तर टिश्यू पेपरने सॅनिटाइज करा.
७. याप्रकारची कामे जर तुम्ही ग्लोव्हज घालून केली तर बरे होईल. काम झाल्यावर ग्लोव्हज घरातील इतर सदस्यांपासून लांब ठेवा.
८. यानंतर साबणाने हात-पाय आणि तोंड धुवा. शक्यतो अंघोळ करणे जास्त उत्तम होईल. या सगळ्या गोष्टी फॉलो केल्याने घरात कोरोना व्हायरसचा धोका राहणार नाही.