‘लक्ष्मी बॉम्ब’ ते ‘भुज’पर्यंत OTT वर रिलीज होणार ‘हे’ 7 बडे सिनेमे !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा कहर अजूनही सुरूच आहे. अशात एंटरटेंमेंट इंडस्ट्रीवरही याचा खूप वाईट परिणाम होत आहे. कारण अनेक सिनेमे तयार आहेत परंतु सिनेमा हॉल बंद असल्यां त्यांची रिलीज अडकली आहे. अशात आता हे सिनेमे ओटीटीवर रिलीज केले जाणार आहेत.

अनेक बड्या कलाकारांचे सिनेमे डिज्नी प्लस हॉट स्टारवर रिलीज केले जाणार आहेत. ट्रेड अ‍ॅनलिस्ट तरण आदर्शनं यासंदर्भातील माहिती ट्विटरवरून दिली आहे. त्यानं लिहिलंय की, “हे ऑफिशियल आहे. लक्ष्मी बॉम्ब, भुज, सडक 2, दिल बेचारा, द बिग बुल, खुदा हाफिज आणि लूट केस असे अनेक सिनेमे आता ओटीटीवर रिलीज केले जाणार आहेत. सर्वात आधी ज्या सिनेमाचा प्रीमियर होणार आहे तो आहे सुशांत सिंह राजपूतचा सिनेमा दिल बेचारा आहे. हे अक्षय कुमार, अजय देवगण, संजय दत्त, अभिषेक बच्चन, आलिया भट आणि वरुण धवन यांचे सिनेमे जुलै ते ऑक्टोबर 2020 मध्ये रिलीज केले जाणार आहेत.”

आलिया-वरुण होतायेत बॉयकॉट
सिनेमे रिलीजची बातमी समोर आल्यानंतर आता चाहते खूप खुश आणि उत्साहित झाले आहेत. अक्षय कुमार आणि अजय देवगण यांचे सिनेमे पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत. परंतु अधिकाधिक लोक सुशांतच्या निधनामुळं अजूनही संतप्त आहेत. हे लोक आलिया भट आणि वरुण धवनच्या सिनेमांना बॉयकॉट करताना दिसत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like