Corona : ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे परिस्थिती अनियंत्रित; जगाचा नाश होण्याआधी ‘कॉन्सनट्रेटर्स’ बचाव करतील का?

पोलीसनामा ऑनलाइन – रक्तामध्ये ऑक्सिजनची कमी covid-19 च्या सर्वात मोठ्या धोक्यांमधील एक आहे. व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी जवळ जवळ प्रत्येकाला ऑक्सिजन सपोर्टची गरज आहे. अशात एका बाजूला कोरोनाची गती वाढत आहे आणि रुग्णालयात रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत, तेच दुसऱ्या बाजूला ऑक्सिजनला सिक्योर करून ठेवणे हे एक मोठे आव्हान बनले आहे

ऑक्सिजनच्या कमीमुळे ऑक्सिजनच्या कॉन्सनट्रेटर्स चा उपयोग वाढला आहे. जवळ जवळ सर्व शहरांमध्ये रुग्ण याचा वापर करत आहेत. अशा वाईट परिस्थितीत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स जीवन रक्षक बनत आहे.

covid-19 च्या आजाराशी सामना करत असलेल्या रुग्णांसाठी ही वेळ धक्कादायक आहे. यामध्ये हलकी लक्षणे असलेले रुग्ण यामुळे प्रभावित होऊ शकतात. यासाठी ऑक्सिजनच्या स्तराला ट्रेक करणे गरजेचे आहे. अशात सर्व कोविड रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स ठेवण्याची गरज आहे का? यामुळे या गंभीर आजारापासून बचाव होऊ शकतो का? दिवस- प्रतिदिवस याच्या मागणीचा वेग वाढत आहे.

ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स काय आहे?
ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स ऑक्सिजन सिलेंडर्सच्या जागी वापरले जाणारे एक उपकरण आहे, ज्याचा वापर दोन प्रमुख कारणांमुळे केला जातो. पहिला, रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यास ऑक्सिजन थेरेपी देण्यासाठी आणि दुसरा, शरीराच्या प्रॉपर फंक्शनिंगसाठी.

कसे काम करते?
ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स ठीक त्याचप्रकारे काम करते, जसे शरीरात ऑक्सिजनची गरज भासल्यावर ऑक्सिजन टँक करते. यामध्ये कैनूला, ऑक्सिजन मास्क आणि एक नसल ट्यूब असते. तथापि, ऑक्सिजन सिलेंडरचा प्रयोग निश्चित वेळेसाठीच केला जाऊ शकतो. तेच, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स जवळपासच्या हवेला एकत्र करून ऑक्सिजन बनवते.

अशाप्रकारचे प्रोसेस रिप्लेसमेंट अथवा रिफिलिंग या गरजेला कमी करते. हे प्रत्येक व्यक्तीची आवश्यकता लक्षात घेऊन याचे अनेक प्रकार आणि साईजमध्ये उपलब्ध केले आहे. कॉन्सनट्रेटर्स चा वापर ऑक्सिजन सिलेंडर्सच्या तुलनेत सोपा आहे, जे वाईट काळात अनेक परिवारांसाठी उपयुक्त सिद्ध झाले आहे.

रुग्णालयात बेडच्या कमी संख्याना लक्षात घेऊन डॉक्टर्स होम बेस्ड थेरेपी आणि उपचारासाठी रुग्णांना कॉन्सनट्रेटर्स राहण्याचा सल्ला देतात. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्यांना वारंवार रुग्णालयात जावे लागणार नाही आणि तब्बेत बिघडल्यावर त्यांना लगेच ऑक्सिजन दिले जाऊ शकते.

ऑक्सिजनच्या पातळीमध्ये वारंवार होत असलेल्या चढ-उतारामुळे कोरोना पॉजिटीव्ह असलेल्या अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. डॉक्टरांच्या मतानुसार, फुफ्फुसासह एल्वियोली मध्ये इन्फेक्शनच्या कारणामुळे शरीरामध्ये ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो आणि रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो, छातीत दुखू लागते आणि रेस्पिरेटरीसोबत जोडलेले अनेक त्रास झेलावे लागतात. अशात ऑक्सिजनची कमी पातळी हाइपोक्सीयाचे कारण होऊ शकते, जे खूप धोकादायक आहे.

ब्लड ऑक्सिजन लेव्हल ९३ च्या खाली जाणे प्राणघातक समजले जाते. तथापि अनेक तज्ञ असे म्हणतात की ऑक्सिजन इंबैलेंसच्या सर्व प्रकरणांमध्ये रुग्णांना इंटेन्सिव केअर सपोर्ट आणि हॉस्पिटलायजेशनची गरज असते. उदाहरणासाठी, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स अथवा सिलेंडर्स यांसारख्या उपकरणाच्या साहाय्याने या बिघडत असलेल्या परिस्थितीमध्ये हलक्या अथवा मध्यम प्रकरणांना रोखले जाऊ शकते.

मेडिकल जगातील अनेक विशेष तज्ञ होम आयसोलेशनमध्ये रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर्स ची उपलब्धता हा चांगला पर्याय मानत आहेत. यामध्ये जास्त त्रास झाल्यास रुग्णांना सहज आराम मिळेल. तज्ञांच्या मते, कॉन्सनट्रेटर्स हवेतून नायट्रोजन काढून ऑक्सिजन बनवते आणि याला रुग्णांच्या शरीरामध्ये पोहचवते.