त्वचेवर 9 तासापर्यंत जिवंत राहू शकतो ‘कोरोना’, मास्कमध्ये श्वास घेण्यासंदर्भात देखील तज्ञांचा मोठा खुलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस माणसाच्या त्वचेवर अनेक तास जिवंत राहू शकतो. एका नव्या स्टीडीत यास दुजोरा मिळाला आहे. स्टडीत हे सुद्धा समजले आहे की, कोविड-19 चे ट्रान्समिशन मोठ्याप्रमाणात एरोसोल आणि ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून होते. ’क्लीनिकिल इन्फेक्शियस डिसीज’मध्ये प्रकाशित या स्टडीमध्ये संशोधकांनी म्हटले आहे की, व्हायरसपासून वाचण्यासाठी हातांची चांगल्या प्रकारे स्वच्छता आवश्यक आहे.

हेल्दी वॉलिंटियर्सना कोरोनाच्या इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी संशोधकांनी स्टडीच्या दरम्यान कॅडेटच्या स्किनचा वापर केला होता. एक्सपर्टचा रिपोर्टमध्ये दावा आहे की, इन्फ्लूएंजा सारखा घातक व्हायरस सुद्धा माणसाच्या त्वचेवर 2 तासांपेक्षा जास्त वेळ टिकत नाही. परंतु, कोरोना व्हायरस 9 तासांपेक्षा सुद्धा जास्त वेळ स्कीनवर सर्वाइव्ह करू शकतो.

संशोधकांनी सांगितले आहे की, 80% अल्कोहोलयुक्त सॅनिटायजर केवळ 15 सेकंदात कोणत्याही प्रकारच्या व्हायरसला स्किनवरून गायब करू शकते. यूएस फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीव्हेंशन सुद्धा अल्कोहोलच्या सॅनिटायजरने हात धुण्याचा सल्ला देते. सॅनिटायजर किंवा साबणाने 20 सेकंदपर्यंत हात धुण्याने कोरोना संसर्गाचा धोका एकदम कमी होतो.

मोठ्या कालावधीपासून लोकांच्या मनात भिती होती की, सतत मास्क घातल्याने शरीरात ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे नुकसान होऊ शकते. याबाबत सुद्धा रिपोर्टमध्ये खुलासा करण्यात आला आहे. संशोधकांनी रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, एक अ‍ॅव्हरेज फेस मास्क अनकम्फर्टेबल होऊ शकतो, परंतु फुफ्फुसापर्यंत पोहोचणार्‍या ऑक्सीजनला बाधित करू शकत नाही.

संशोधकांनी गॅस एक्सचेंजवर सर्जिकल मास्कची टेस्टसुद्धा घेतली. या प्रक्रियेत शरीर रक्ताला ऑक्सीजनशी जोडते आणि कार्बन कार्बन डायऑक्साइड सोडते. 15 हेल्दी फिजीशियन आणि मिलिट्रीच्या 15 वयस्क फुफ्फुसांच्या रोगाने पीडित लोकांना सपाट आणि कठीण पृष्ठभागावर 6 मिनिट वॉकच्या दरम्यान चाचणी घेण्यात आली होती.

वॉकिंग टेस्टच्या अगोदर सर्व वॉलिंटियर्सच्या रक्तातील ऑक्सीजन आणि कार्बन डायऑक्साइडची मात्रा मोजण्यात आली होती. रिपोर्टनुसार, हेल्दी डॉक्टर्स आणि पीडित लोकांच्या टेस्टच्या अर्ध्या तासानंतर फुफ्फुसातील ऑक्सीजनमध्ये कोणताही मोठा बदल झाला नव्हता.

संशोधकांनी थोरॅक्स जर्नलमध्ये कार्बन डायऑक्साइडसह श्वास घेणे आणि ऑक्सीजनच्या स्तरात कमतरता येण्याचे दावे नाकारले. मास्क चेहर्‍याच्या संवेदनशील नसांना त्रासदायक ठरून असुविधा निर्माण करू शकतो, गरम हवा किंवा क्लॉस्ट्रोफोबिया सारखे जाणवू शकते. परंतु, जास्त चिंतेचा विषय नाही.