Coronavirus in India : देशात पुन्हा ‘अनियंत्रित’ झाला ‘कोरोना’, 5 महिन्यानंतर एका दिवसात आल्या 53 हजार पेक्षा जास्त केस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना व्हायरसचा वेग पुन्हा एकदा अनियंत्रित झाला आहे. मागील 24 तासात देशात 53 हजारपेक्षा जास्त कोरोना व्हायरसच्या नव्या केस नोंदल्या गेल्या. सुमारे पाच महिन्यानंतर भारतात 50 हजार कोरोना केसचा आकडा पार झाला आहे, जो भितीदायक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, मागील 24 तासात देशात 53,476 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. तर 251 लोकांचा मृत्यू झाला आहे. सोबतच 26490 लोक कोरोनावर मात करून बरे झाले आहेत.

याच आकड्यांसह आता देशात एकुण केसची संख्या 1,17,87,534 वर पोहचली आहे. तर अ‍ॅक्टिव्ह केसची संख्या 3,95,192 झाली आहे. भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरस मुळे 1,60,692 लोकांचा मृत्यू झाला आहे. जर व्हॅक्सीनेशनवर नजर टाकली तर भारतात आतापर्यंत 5,31,45,709 व्हॅक्सीनचे डोस दिले गेले आहेत.

भितीदायक आहे महाराष्ट्राचा कोरोना ग्राफ
देशात सर्वात जास्त भयावह स्थिती महाराष्ट्रातून समोर आली आहे, येथे काल 31 हजारपेक्षा जास्त कोरोना केस नोंदल्या गेल्या. महाराष्ट्रात प्रत्येक दिवशी कोरोना व्हायरसची नवी प्रकरणे आपलेच जुने रेकॉर्ड तोडत आहेत. यामुळे आता राज्याने अनेक शहरात लॉकडाऊन लावले आहे. महाराष्ट्रात आता अ‍ॅक्टिव्ह केसची संख्या सुद्धा अडीच लाख झाली आहे, ज्या संपूर्ण देशाच्या आकड्यापेक्षा जास्त केस आहेत.

महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीत सुद्धा भिती
देशाची राजधानी दिल्लीत सुद्धा पुन्हा एकदा कोरोना वेगाने वाढत आहे. येथे महाराष्ट्राएवढे भितीदायक आकडे नसले तरी, मागील काही काळापासून जो ट्रेंड सुरू होता तो तुटला आहे. काल दिल्लीत 1200 पेक्षा जास्त केस नोंदल्या गेल्या, जो या वर्षातील सर्वात मोठा आकडा आहे. अशावेळी दिल्लीत सक्ती वाढवण्यात आली आहे, बाजार, मॉल, मल्टीप्लेक्समध्ये कोरोना गाईडलाईन्सचे पालन अनिवार्य केले आहे.

महाराष्ट्र आणि दिल्लीच्या शिवाय अनेक राज्य सुद्धा अशी आहेत, जिथे काल जेवढ्या केस समोर आल्या आहेत तो सर्वात मोठा आकडा आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडु, बंगाल या राज्यांचा लिस्टमध्ये समावेश आहे. तर, युपीमध्ये सुद्धा जानेवारी नंतर पहिल्यांदा 700 पेक्षा जास्त केस नोंदल्या गेल्या.