Coronavirus in India : धोकादायक झाला कोरोनाचा वेग ! गेल्या 24 तासात पहिल्यांदाच समोर आले 1 लाखांपेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा वेग अनियंत्रित झाला आहे आणि नवीन लाट सर्वात मोठे आव्हान बनून समोर आली आहे. देशात पहिल्यांदा 24 तासांच्या आत एक लाखापेक्षा जास्त कोरोना व्हायरसच्या केस नोंदल्या गेल्या आहेत. सोमवारी भारतात कोरोना व्हायरसची 1.03 लाख प्रकरणे समोर आली आहेत.

हा आकडा राज्यांद्वारे जारी आकड्यांनुसार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा आकडा येणे बाकी आहे. देशात यापूर्वी 16 सप्टेंबर 2020 ला सर्वात जास्त प्रकरणे समोर आली होती, तेव्हा एका दिवसात 97,894 केस नोंदल्या गेल्या होत्या.

महाराष्ट्रात एका दिवसात 222 लोकांचा मृत्यू
महाराष्ट्रात कोरोनाच्या केस विक्रमी वेगाने वाढत चालल्या आहेत. मागील 24 तासात महाराष्ट्रात कोरोनाची 57 हजारपेक्षा जास्त प्रकरणे सापडली आणि 222 लोकांचा मृत्यू झाला. आकड्यांनुसार महाराष्ट्रात रविवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 57,074 नवी प्रकरणे समोर आली, जी कोणत्याही एका दिवसात राज्यातील सर्वाधिक संख्या आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत संसर्गाची एकुण 30,10,597 प्रकरणे सापडली आहेत, तर एकुण मृतांचा आकडा वाढून 55,878 पर्यंत पोहचला आहे.

मुंबईत 11,206 नवी प्रकरणे
मुंबई शहरात रविवारी कोविड-19 ची एका दिवसात सर्वाधिक 11,206 नवी प्रकरणे समोर आली. महाराष्ट्रात कोविडच्या सध्या 4,30,503 रूग्णांवर उपचार सुरू आहे. तर, रविवारी 27,508 रूग्णांना संसर्गमुक्त झाल्यानंतर घरी सोडण्यात आले, ज्यानंतर एकुण बरे झालेल्या रूग्णांची संख्या 25,22,823 झाली आहे.

नागपुरात 4 हजारपेक्षा जास्त नवीन रूग्ण
नागपुरात 24 तासात 4 हजारपेक्षा जास्त नवीन रूग्ण सापडले आहेत, 62 लोकांचा मृत्यू झाला. तर पुण्यात 6225 नवे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आणि 52 लोकांचा मृत्यू झाला.