कोरोना बनला ‘सायलेंट किलर’; मुंबईमध्ये 91 हजारांमधील 74 हजार रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत

पोलीसनामा ऑनलाईन टीम : देशातील कोरोना विषाणूंच्या लाटेचा केंद्रबिंदू महाराष्ट्र असल्याचे दिसून येत आहे. बरेच दिवस महाराष्ट्रात ३० हजाराहून अधिक केसेसची नोंद होत आहे. यामध्येच BMC चे कमिश्नर इकबाल सिंह चहल यांनी सांगितले की मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरु झाली आहे. मुंबईमध्ये फक्त ४९ दिवसांमध्ये ९१ हजार कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

BMC च्या कमिशनरच्या म्हणण्यानुसार, मुंबईत आता ७४ हजार केसेस असे आहेत ज्यांच्यात कोरोनाचे काहीच लक्षण दिसत नाहीत. म्हणजेच कोरोना आता एक ‘सायलेंट किलर’ च्या रूपात वाढताना दिसत आहे. जो कोणत्याही लक्षणाशिवाय लोकांना आपल्या जाळ्यात ओढत आहे. जर इतर प्रकरणांबाबत बोलायचे झाले तर मुंबईत जवळ जवळ १७ हजार लोकांना कोरोनाची लक्षणे आहेत. अर्ध्या केसेसमध्ये लोकांना कोरोनाची काहीच लक्षणे दिसली आहेत.

ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत आणि ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांना घेऊन BMC कमिश्नर यांनी म्हंटले आहे की त्या सर्वांवर शिक्के लावले जात आहेत. जर असे लोक सार्वजनिक ठिकाणी आढळल्यास त्यांच्यावर FIR दाखल केला जाईल. अशा लोकांना अटक केले जाऊ शकते.

सरकारला लॉकडाऊन नको आहे
BMC कमिश्नर यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत ९९०० रुग्णालयात बेड भरलेले आहेत. ज्यात ४००० बेडची सुविधा या आठवड्यात ऑनलाईन केली गेली आहे. सरकारला लॉकडाऊन कराचे नाही आहे. जर लोक कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करतील तर परिस्थिती आटोक्यात येऊ शकते.

BMC चे कमिश्नर इकबाल सिंह चहल म्हणाले की मुंबईमध्ये आम्ही कमीत कमी सक्ती लागू केली आहे. आता मुंबईमध्ये कोरोनामुळे होणारी मृतांची संख्या नियंत्रणात आहे. जर कोणी मास्क घालत नसेल अथवा मार्गदर्शक सूचना पाळत नसतील तर त्यांच्यावर २०० रुपये दंड लावला जात आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत सर्वात अधिक पावत्या दिल्या गेल्या आहेत.

महाराष्ट्राने सर्वांची वाढविली चिंता
महाराष्ट्रात मार्च महिन्यात कोरोना विषाणूंचे प्रमाण बेकायदेशीर होत आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूंचे एकूण ३.४० लाख अ‍ॅक्टिव्ह केसस आहेत. यातील मुंबईमध्ये ४७ हजारांहून अधिक केसेस अ‍ॅक्टिव्ह आहेत, तेच पुण्यात ५७ हजारांजवळ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्रात दर दिवसाला ५ हजाराहून अधिक केसेस येत होत्या, तेच आता ३० हजाराहून अधिक प्रतिदिवसाला केसेसचे प्रमाण पोहचले आहे.

देशात मंगळवारी म्हणजे ३० मार्चला ५३४८० केसेस आलया. यात महाराष्ट्राची भागीदारी २७९१८ होती, तेव्हा देशात ३५४ जणांचा मृत्य झाला त्यात महाराष्ट्रातील १३९ जणांचा मृत्यू झाला. मुंबईमध्ये आतापर्यंत ६०० इमारतींना कंटेन्टमेंट झोनच्या रूपात सील केले गेले आहे. महाराष्ट्रावरील संकट सातत्याने तीव्र होत आहे. हेच कारण आहे की सरकार या लॉकडाउनवर गंभीरपणे विचार करीत आहे आणि CM उद्धव ठाकरे यांनी याबाबत वारंवार इशारा दिला आहे. लोक नियमांचे उल्लंघन करीत राहिले तर लॉकडाऊन करण्याचा अंतिम निर्णय होईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.