‘कोरोना’ची वाढतेय दहशत ! फक्त 3 आठवडयात भारतात 1 लाखाहून जास्त बाधित, 2600 पेक्षा अधिक मृत्यू

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   देशात कोरोना विषाणूचा कहर कायम आहे. कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी भारतात 25 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचा वेग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मंगळवार (26 मे) पर्यंत देशात 1 लाख 45 हजार 380 रुग्णांची नोंद झाली असून 4 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहेत. पहिल्या आणि दुसर्‍या लॉकडाऊनमध्ये, जेथे सरकारकडून सवलती कमी केल्या गेल्या, तेव्हा कोरोना प्रकरणेही नियंत्रणात होती, परंतु तिसर्‍या आणि चौथ्या लॉकडाऊनमध्ये सूट वाढल्यामुळे साथीच्या प्रकारणांतही वाढ झाली आहे. कोरोनाचा तेजीने होणारा प्रादुर्भाव आपण वाढत्या आकड्यानुसारही पाहू शकता. तीन आठवड्यांपूर्वी म्हणजेच 4 मे रोजी भारतात 43,000 प्रकारणांसह 1,400 लोंकाच्या मृत्यूची नोंद होती. तर आता 1 लाख 45 हजार 380 प्रकरणांची नोंद असून 4 हजार 167 लोकांनी आपला जीव गमावला आहे. म्हणजेच तीन आठवड्यांत देशात 1 लाख 2 हजार प्रकरणे नोंदवली गेली आणि 2600 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोणत्या राज्यात किती प्रकरणे?

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. येथे 52 हजाराहून अधिक प्रकरणे आहेत आणि जवळपास 1700 लोक मरण पावले आहेत, तर तामिळनाडूमध्ये एकूण 17 हजाराहून अधिक रुग्ण आहेत. मध्य प्रदेशात एकूण रुग्णांची संख्या 6859 आहे, ज्यामध्ये 300 लोकांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातही एकूण पुष्टी झालेल्या घटनांची संख्या 6532 वर पोहोचली असून त्यामध्ये 165 लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमधील रुग्णांची संख्या 2730 आहे, ज्यामध्ये 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीतही एकूण कोरोना रूग्णांची संख्या 14 हजारांच्या पलीकडे गेली आहे. आतापर्यंत येथे 276 लोकांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानमधील कोरोनाचे एकूण रुग्ण 7300 असून 167 लोक मरण पावले आहेत.

16% जिल्ह्यात 7 दिवसात 100% पेक्षा जास्त कोरोनाची प्रकरणे

भारतातील जवळपास 16 टक्के जिल्ह्यात सात दिवसांत कोरोना विषाणूचे प्रमाण 100 टक्क्यांहून अधिक वाढले आहे. यातील निम्मे जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत. दरम्यान, 717 जिल्ह्यातील हे आकडे 20 मेपर्यंतचे आहेत. मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरांतून परप्रांतीय कामगार आपल्या घरी परतल्यामुळे ही तेजी आली असल्याचे तज्ज्ञ आणि आरोग्य अधिकारी सांगतात.

गेल्या 24 तासांत 6535 नवीन प्रकरणे

गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6 हजार 535 नवीन रुग्ण आढळले असून 146 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 80 हजाराहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत. महाराष्ट्रात संक्रमित झालेल्यांची संख्या 52 हजार 667 वर पोहोचली असून, त्यात 1695 जणांनी आपला जीव गमावला आहे.