Coronavirus Latest Updates : जगात ‘कोरोना’ची प्रकरणे 3 कोटींच्या पुढे, भारतात 41 लाख लोक झाले बरे

नवी दिल्ली : जगभरात कोरोना महामारीच्या संक्रमितांची संख्या 3 कोटींच्या पुढे गेली आहे. तर मरणार्‍यांची संख्या वाढून 9.45 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. कोरोनाने सर्वात जास्त अमेरिका आणि भारतात प्रकोप माजवला आहे. देशात कोरोनाचा वेग पुन्हा एकदा अनियंत्रित होताना दिसत आहे. देशभरात कोरोनाचे आकडे वेगाने वाढत आहेत. केवळ 24 तासातच 97 हजारपेक्षा जास्त कोरोना संक्रमित आढळले आहेत.

आतापर्यंत या महामारीने 84 हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव घेतला आहे. देशात आता कोरोनाचा एकुण आकडा 52 लाखांच्या पुढे गेला आहे. येथे 41 लाखांपेक्षा जास्त लोक बरे होऊन घरी परतले आहेत, तर, 10.17 लाख लोक अजूनही हॉस्पीटलमध्ये आहेत.

महाराष्ट्राला सुद्धा कोरोनाचा भयंकर फटका बसला आहे. देशात सर्वात जास्त कोरोना संक्रमित महाराष्ट्रात आहेत आणि राज्यात रोज सर्वात जास्त कोरोना संक्रमित सापडत आहेत. राज्यात अवघ्या 24 तासात 24,619 कोरोना संक्रमित सापडले आहेत आणि 398 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासोबत राज्यात कोरोना संक्रमितांचा आकडा 11.45 लाखांपेक्षा जास्त झाला आहे.

महाराष्ट्रातील आकडे

एकुण संक्रमित – 11,45,840
एकुण मृत – 31,351
24 तासात बरे झालेले रूग्ण – 19,522
बरे झालेले रूग्ण – 8,12,354
कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केस – 3,01,752

मुंबईत संसर्गाची 2,411 नवी प्रकरणे समोर आली आहेत, ज्यानंतर शहरातील एकुण संक्रमितांची संख्या वाढून 1,78,385 झाली आहे. तर संसर्गाने आणखी 43 जणांचा मृत्यू झाल्यानंतर एकुण मृतांची संख्या वाढून 8,323 झाली आहे. पुण्यात संसर्गाची 2,269 नवी प्रकरणे समोर आली आहेत आणि आतापर्यंत एकुण 1,36,393 लोक संक्रमित झाले आहेत. तर 28 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर एकुण मृतांची संख्या वाढून 3,102 झाली आहे.