Corona Virus : चीनमधून भारतीयांना परत आणण्याचा ‘सिलसिला’ चालूच, स्वदेशात पोहचले 647 लोक

दिल्ली : वृत्तसंस्था – चीनला कोरोना हा अभिशाप बनला आहे. चीनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारत सरकार परत घेऊन येत आहे. शनिवारी एअर इंडियाच्या स्पेशल फ्लाइटने चीनमधील ३२४ भारतीय नागरिकांना नवी दिल्ली येथे आणले होते. त्यानंतर आज (रविवार) सकाळी एअर इंडियाच्या आणखी एक विमान भारतीय नागरिकांना घेऊन आले आहे.

चीनच्या वुहान शहरातुन एअर इंडियाने ३२३ भारतीयांना घेऊन उड्डाण घेत स्वदेशात परत आले आहे. त्यामध्ये मालदीवच्या ७ नागरिकांनाही घेऊन दिल्लीला आणले आहे. या विमानाने वुहान शहरामधून सकाळी ३.१० वाजता उड्डाण घेतले होते.

चीनमधील भारतीय राजदूत विक्रम मिस्रीने याची माहिती देत म्हणाले कि, या विमानात भारतातील ३२३ आणि मालदीवच्या ७ नागरिकांचा समावेश आहे.  मालदीवच्या विदेशी मंत्री अब्दुल्ला शाहिद यांनी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि विदेशी मंत्री जयशंकर यांचे आभार मानत म्हणाले, वुहानमधील मालदीवच्या ७ नागरिकांना दिल्लीमध्येच निगराणीत ठेवले जाईल.

या विमानामध्ये क्रू मेंबर्ससोबत राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे 5 डॉक्टर आणि पैरामेडिकल स्टाफ सोबत आहे. यांच्या सोबत लागणारे औषध, मास्क व आवश्यक वस्तूही सोबत आहेत. चीनमधून परत येणाऱ्या विमानामध्ये ३२३ भारतीय नागरिकांसह आतापर्यंत ६४७ नागरिकांना नवी दिल्लीत परत आणले आहे.

मानेसर कॅम्पमध्ये विशेष निगरानित ठेवणार
चीनमधून परत आलेल्या सर्व भारतीय आणि मालदीवमधील लोकांना दिल्लीतील छावला आणि हरियाणातील मानेसर कॅम्पमध्ये विशेष निगरानित ठेवले जाणार आहे. त्यांना २ आठवड्यापर्यंत कोणालाही भेटु दिले जाणार नाही. भारतामध्ये आतापर्यंत दोन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, ते दोनीही रुग्ण केरळमधील आहेत.

यामध्ये जगातील १८ देश जाळ्यात
चीनमधून सुरु झालेल्या कोरोनाच्या जाळ्यात जगातील १८ देश आले आहेत. रविवारी चीनच्या बाहेर कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा मृत्यू हेल्थ इमरजेंसीने फिलीपींसमध्ये झाल्यास सांगितले आहे.