Coronavirus : जगभरात ‘कोरोना’ व्हायरसचा हाहाकार ! मृत्यूचा आकडा 4600 च्या पार, जाणून घ्या कुठं किती जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  चीनबाहेर कोरोनाच्या मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे.  इटली आणि इराणमध्ये संक्रमण वेगाने पसरत आहे. माहितीनुसार जगातील 124 देशांमध्ये कोरोनाचा धोका असून एकूण 1,26,367 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत जगभरात 4,633 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर एकूण, 68,304 लोकांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने चीन, इराण आणि इटलीमध्येही कोरोना विषाणूचा साथीचा रोग जाहीर केला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारताने परदेशातून येणाऱ्या लोकांचा व्हिसा येत्या 15 एप्रिलपर्यंत निलंबित केला आहे. या बंदीत अधिकारी, संयुक्त राष्ट्रांचे कर्मचारी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या कर्मचाऱ्यांना सूट मिळणार आहे. ही बंदी 13 मार्च 2020 पासून लागू होईल.

अमेरिकेने युरोपच्या सर्व सहलींवर घातली बंदी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढच्या एक महिन्यासाठी युरोपपासून अमेरिकेच्या सर्व भेटींवर बंदी घातली आहे. दरम्यान, युके या बंदीमधून वगळण्यात आला आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 38 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 1300 लोकांना याचा संसर्ग झाल्याचे समजते.

कोरोना संक्रमित देश आणि मृत्यूची संख्या

चीन 3169

इटली 827

इराण 354

दक्षिण कोरिया 66

स्पेन 55

फ्रान्स 48

अमेरिका 38

जपान 15

स्वित्झर्लंड 4

जर्मनी 3