Corona Virus | देशात पुन्हा कोरोना हातपाय पसरवतोय; ‘या’ राज्यांनी वाढवली चिंता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाच्या मागील लाटांनी देशातच नाहीतर जगभर थैमान घातलं होतं. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. आता कुठे कोरोनाची (Corona Virus) लाट मंदावली होती त्यामुळे सर्व काही पुन्हा एकदा सुरळीत चालू होत असताना पुन्हा एकदा कोरोना (Corona Virus) डोकं वर काढू लागला आहे. काही राज्यात संख्या पुन्हा वाढू लागली आहे.

 

कोरोनाच्या (Corona Virus) सब व्हेरिअंटचा सामना जगाला करावा लागत असल्याचं दिसत आहे. भारतामध्येही जवळपास चार कोटींचा टप्पा पार केला आहे याबाबत आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health) आकडेवारी जाहीर केली आहे. देशातील 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये (Union Territory) सक्रीय रूग्णांची संख्या वाढली आहे.

 

राजधानी दिल्लीचा पॉझिटीव्हिटी रेट हा 2.39 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
दिल्ली – एनसीआर (Delhi – NCR) आणि मुंबईमध्ये (Mumbai) कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे.
दिल्लीच्या शेजारील नोएडामध्ये (Noida) आणि गुरूग्राम (Gurugram) येथेही नवीन रूग्ण आढळले असून आता सक्रीय रूग्णांची संख्या 325 वर पोहोचली आहे.
नोएडामध्ये गौतमबुद्ध नगरमध्ये 44 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

 

दरम्यान, मुंबईतही कोरोनाचे नवीन 73 रूग्ण वाढले आहेत.
मुंबईत कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं मुंबई महापालिकेने Brihanmumbai Municipal Corporation (BMC) सांगितलं आहे.
त्यामुळे आता निर्बंध जरी शिथिल केले असले तरी नागरिकांनी बेजबाबदारपणे वागलं नाही पाहिजे अन्यथा पुन्हा एकदा सर्वांना कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो.

 

Web Title :- Corona Virus | coronavirus live updates omicron delta recombination xe variant fourth wave case rises in delhi mumbai doctors alert

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा