Coronavirus : देशात ‘कोरोना’च्या 73 रूग्णांवर उपचार सुरू, 10 जण झाले ‘तंदुरूस्त’ तर आतापर्यंत दोघांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देश आणि जगात कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत चालला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगात 5 हजारपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत. तर भारतात सुद्धा यामुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या लोकांवर उपचार सुरू आहेत.

भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसाचा संसर्ग झालेले 85 रूग्ण आढळले आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार या 85 प्रकरणात 10 लोकांवर उपचार करण्यात आले आहेत. याशिवाय 2 रूग्णांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे दोघांचा मृत्यू

भारतात कोरोना व्हायरसमुळे पहिला मृत्यू कर्नाटकात एका 76 वर्षांच्या व्यक्तीचा झाला. तर कोरोना व्हायरसचा दुसरा मृत्यू दिल्लीत 69 वर्षीय महिलेचा झाला. कोरोना व्हायरसची लक्षणे आढळल्यानंतर या महिलेला दिल्लीच्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते.

कुठे-कुठे सापडले रूग्ण?

भारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 85 रूग्ण सापडले आहेत. यात दिल्ली -7 (एकाचा मृत्यू-एकावर उपचार झाले), हरियाणा-14, केरळ-19 (तीनजणांवर उपचार झाले), राजस्थान-3 (एकावर उपचार झाले), तेलंगाना-1 (एकावर उपचार झाले), उत्तर प्रदेश-11 (पाच जणांवर उपचार झाले), लडाख-3, तमिलनाडु-1, जम्मू काश्मीर-1, पंजाब-1, कर्नाटक -6 (एकाचा मृत्यू), महाराष्ट्र-17 आणि आंध्र प्रदेश-1 रूग्ण आढळला आहे.

अमेरिकेत इमर्जन्सी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसच्या संकटाला राष्ट्रीय आपत्ती जाहीर केले आहे. यासोबतच ट्रम्प प्रशासनाने या भयंकर संसर्गाला तोंड देण्यासाठी अभूतपूर्व आर्थिक आणि वैज्ञानिक उपायांचा आधार घेतला आहे. पुढील काही महिन्यातच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असणारे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कोरोनाबाबत कोणताही निष्काळजीपणा करण्यास तयार नाहीत.

ट्रम्प यांनी म्हटले की, त्यांच्या या अ‍ॅक्शनमुळे कोरोना व्हायरसविरूद्ध लढण्यासाठी 50 अरब डॉलरचा निधी मिळणार आहे. अमेरिकेच्या केंद्रीय, विभागीय आणि स्थानिक एजन्सीज कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी हा निधी वापरतील. अमेरिकेत आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे सुमारे 40 लोकांचा मृत्यू झाला आहे.