माजी क्रिकेटर आणि योगी सरकारमधील मंत्री चेतन चौहान यांची किडनी ‘फेल’, लाइफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   उत्तर प्रदेशचे होमगार्ड मंत्री आणि माजी क्रिकेटर चेतन चौहान यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याच दरम्यान सकाळी त्यांची किडनी फेल झाली. त्यांना सध्या लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले असून प्रकृती गंभीर आहे. नुकतेच चेतन चौहान कोरोना व्हायरसने संक्रमित आढळले होते.

जुलै महिन्यात चेतन चौहान यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मात्र, आता चेतन चौहान यांची प्रकृती खुप बिघडत चालली आहे. डॉक्टर्सनुसार, चौहान यांची प्रकृती गंभीर आहे. चेतन चौहान अमरोहा जिल्ह्यातील नौगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत.

चेतन चौहान भारतीय क्रिकेट टीमचे महत्वाचे फलंदाज होते. तर आता चौहान राजकारणात सक्रिय होते. चेतन चौहान भाजपाचे लोकसभा खासदार सुद्धा होते. 1991 आणि 1998 च्या निवडणुकीत ते भाजपाच्या तिकिटावर निवडूण आले होते.

क्रिकेट करियर

चेतन चौहान यांनी भारतीय क्रिकेट टीमसाठी 40 टेस्ट मॅच खेळल्या आहेत. याशिवाय चौहान यांनी सात एकदिवसीय मॅचमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. टेस्ट मॅचमध्ये चेतन चौहान यांच्या नावावर 2084 धावांची नोंद आहे. टेस्ट मॅचमध्ये त्यांचा सर्वोच्च स्कोअर 97 धावांचा आहे.