Coronavirus : महाराष्ट्रातील ‘कोरोना’चा 10 वा बळी, मुंबईमध्ये एकाचा मृत्यू, राज्यात 4 तासात दोघांचा मृत्यू

वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसनं जगात हाहाकार घातला आहे. भारतात कोरोना व्हायरसमुळं आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आज पुण्यात दुपारी एका 52 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळं मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर चार तासानंतर मुंबईत एका 80 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात कोरोनामुळं मृत्यू होणार्‍यांची संख्या आता 10 वर जाऊन पोहचली आहे.


राज्यात आतापर्यंत 215 कोरोनाबाधित आढळले असून त्यांच्यावर वेगवेगळया हॉस्पीटलमध्ये उपचार चालु आहेत. महाराष्ट्रानंतर केरळ राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय गंभीर बनत जात आहे. आज (सोमवार) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पुण्यातील एका 52 वर्षीय व्यक्तीचा खासगी रूग्णालयात मृत्यू झाला होता. त्याघटनेला काही तास पुर्ण होत नाहीत तोपवर मुंबईत 80 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 1197 कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like