Coronavirus : ‘महाराष्ट्र-केरळ-दिल्ली’मध्ये कोरोनाच्या रूग्णांमध्ये झपाटयानं ‘वाढ’, देशातील संख्या 310 पार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे जवळपास 100 पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आली आहेत. पूर्ण देशभरात रुग्णांची संख्या 310 झाली आहे. सर्वात वाईट परिस्थिती महाराष्ट्रात आहे, जिथे आतापर्यंत 63 प्रकरणे समोर आली आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. देशातील 22 राज्ये कोरोनामुळे बाधित झाली आहेत.

जर आपण राज्याच्या आकडेवारीबद्दल बोललो तर आंध्र प्रदेशात 3, छत्तीसगडमध्ये 1, दिल्लीत 26, गुजरातमध्ये 13, हरियाणामध्ये 20, हिमाचल प्रदेशात 2, कर्नाटकात 18, केरळमध्ये 40, मध्य प्रदेशात 4, महाराष्ट्रात 63, ओडिशामध्ये 2, पुडुचेरीमध्ये 1, पंजाबमध्ये 1, राजस्थानमध्ये 2, तामिळनाडूमध्ये 6, तेलंगणामध्ये 21, चंडीगडमध्ये 5, जम्मू-काश्मीरमध्ये 4, लडाखमध्ये 13, उत्तर प्रदेशात 25, उत्तराखंडमध्ये 4 आणि पश्चिम बंगालमध्ये 3 प्रकरणे समोर आली आहेत. यातील 28 लोक बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दिल्ली, केरळ, हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि तेलंगणामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचबरोबर इतर राज्यांतही रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पहिला मृत्यू कर्नाटकातील कलबुर्गी येथे झाला आहे. हे दुबईहून परत आले होते आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यानंतर, दिल्लीत एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, ज्या आपल्या मुलाच्या संपर्कात आल्यानंतर संक्रमित झाल्या होत्या. तिसरा मृत्यू मुंबईत झाला. मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये दुबईहून परत आलेल्या संक्रमित वृद्ध व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. चौथा पंजाबमध्ये झाला. विशेष गोष्ट अशी आहे की, मृत्यू झालेल्या चारही जणांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त होते.