Coronavirus : खळबळजनक ! दिल्लीतील सफदरजंग हॉस्पिटलमध्ये ‘कोरोना’ग्रस्त रूग्णाची आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात सतत कोरोना व्हायरसची दहशत वाढत चालली आहे. तसेच कोरोना व्हायरसचे रूग्णसुद्धा वाढत आहेत. राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रूग्णाने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून 151 झाली आहे.

दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या एका रूग्णाने आत्महत्या केली आहे. या रूग्णाने सातव्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला. मृत 35 वर्षीय रूग्ण काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या सिडनीवरून परतला होता. तो मागच्या एक वर्षापासून तेथे राहात होता. अधिकार्‍याने सांगितले की, या रूग्णाला बुधवारी रात्री सुमारे नऊ वाजता आयजीआय विमानतळावरून संशयित कोरोना रूग्ण म्हणून हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. त्याला डोकेदुखीचा त्रास होता.

चीनच्या वुहानमधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसने भारतालाही विळखा घालण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत भारतात कोरोना व्हायरसचे 159 रूग्ण सापडले आहेत. देशात महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे सर्वात जास्त रूग्ण सापडले आहेत. तर, अनेक लोक कोरोना व्हायरसचे संशयित आहेत.

कोरोना व्हायरसमुळे देशात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. जगात आठ हजारपेक्षा जास्त लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय जगभरात दोन लाख लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

देशात कोरोनाचे एकुण रूग्ण 151

लेहमध्ये लष्कराच्या 34 वर्षीय जवानाला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे आढळून आले, ज्यानंतर लष्कराने देखरेखीचे प्रमाण वाढवले असून युद्ध सराव आणि प्रशिक्षण सत्र रद्द केले आहेत. देशात कोरोना व्हायरसचे एकुण 151 रूग्ण सापडले आहेत. लोकसभेत लिखित उत्तरात परराष्ट्र मंत्री व्ही मुरलीधरन यांनी म्हटले की, परदेशात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या एकुण भारतीयांची संख्या 276 आहे, ज्यामध्ये इराणमध्ये 255, यूएईमध्ये 12, इटलीत 5, हाँगकाँग, कुवेत, रवांडा, श्रीलंकेत एक-एक मामले आहे.