Lockdown 2.0 :’लॉकडाऊन’मध्ये अडकलात अन् मदत हवी असेल तर या नंबर वर करा ‘कॉल’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी देशातील लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. त्याचबरोबर कामगार मंत्रालयाने स्थलांतरित मजुरांच्या पगाराशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी कामगार हेल्पलाईन देखील सुरु केली आहे. पगाराशी संबंधित काही अडचणी असल्यास कामगार दिलेल्या हेल्पलाईनशी संपर्क साधू शकतात आणि संबंधित कामगार तक्रार नोंदवून शकतात. देशाच्या 20 प्रादेशिक केंद्रावर याची सुरुवात करण्यात आली असून या भागातील कामगार या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

यामध्ये अहमदाबाद, अजमेर, आसनसोल, बेंगलुरू, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोचीन, देहरादून, दिल्ली, धनबाद, गुवाहाटी, हैदराबाद, जबलपूर, कानपूर, कोलकत्ता, मुंबई, नागपूर, पटना आणि रायपूर या भागांचा समावेश आहे. हे 20 क्षेत्र आणि त्यांचे नंबर खालील प्रमाणे आहेत.

त्याशिवाय प्रत्येक राज्याचा आणि केंद्रशासित प्रदेशासाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत. ते खालील प्रमाणे आहेत


पगाराशी काही अडचण असल्यास कामगार या हेल्पलाईन क्रमांवर संपर्क साधून आपली तक्रार नोंदवू शकतात असे सरकारने म्हटले आहे. तसेच कामगार विभाग त्यांच्या प्रश्नावर तातडीने तोडगा काढेल. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांचे नंबर जारी केले आहेत.