भीतीदायक ! कोरोनाने अवघ्या 13 दिवसांत तब्बल 50 हजार रुग्णांचा मृत्यू; आत्तापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग पुन्हा एकदा वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर मृतांचा आकडाही वाढताना दिसत आहे. कोरोनाने गेल्या 13 दिवसांत 50 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशात आत्तापर्यंत 3 लाखांपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार, विविध उपाययोजना केल्या जात आहेत. असे असताना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मात्र, मृतांचा आकडा वाढत आहे. जगभरातही कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला. अमेरिकेत 6,04,087 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर ब्राझीलमध्येही मृतांचा आकडा 4,49,185 वर पोहोचला आहे. जगात ब्राझीलचा मृतांच्या आकडेवारीत दुसरा क्रमांक लागतो.

याशियाव भारतातही कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात आत्तापर्यंत 3,03,751 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे 13 दिवसांत तब्बल 50 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.

जुलै महिन्यात संसर्ग होणार कमी

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत मोठा उद्रेक पाहिला मिळत आहे. बाधितांची संख्या वाढण्यासोबतच मृतांचा आकडाही वाढत आहे. पण आता कोरोनाची ही दुसरी लाट जुलै महिन्यात कमी होईल, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. तर दुसरीकडे तिसऱ्या लाटेविषयीही सांगण्यात आले आहे. ही लाट 6 महिन्यांनंतर येईल, असे म्हटले आहे.