Corona virus Delta-3 Variant | कोरोना व्हायरसच्या नवीन म्यूटेशनमुळे जगभरात चिंता, डेल्टा-3 व्हेरिएंटबाबत भारतात सुद्धा अलर्ट

नवी दिल्ली : Corona virus Delta-3 Variant | देशात कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) अजून पूर्णपणे संपलेली नसतानाच तिसर्‍या लाटेबाबत (Third Wave) आतापासून इशारा देण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या नवीन म्यूटेशनने (Corona virus Delta-3 Variant) जगभरातील शास्त्रज्ञांना चिंतेत टाकले आहे.

मागील काही आठवड्यात अमेरिकेत (America) कोरोनाची प्रकरणे जेवढ्या वेगाने वाढली आहेत, ती पाहता असे म्हटले जात आहे की डेल्टा-3 व्हेरिएंट (Delta-3 Variant) आता जगभरात पसरला आहे. डेल्टा-3 व्हेरिएंट अगोदर सापडलेल्या डेल्टाच्या तुलनेत खुप जास्त वेगाने पसरतो तसेच व्हॅक्सीन घेतलेल्या किंवा कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींना पुन्हा संक्रमित करू शकतो.

भारतात कोरोनाच्या डेल्टा-3 व्हेरिएंटचे एकही प्रकरण अद्याप समोर आलेले नाही परंतु जीनोम सिक्वेंन्सिंगची देखरेख करत असलेल्या इन्साकॉग समितीने आतापासून अलर्ट जारी केला आहे.

Corona virus Delta-3 Variant | delta 3 variant of corona spreading rapidly around the world alert in india too

ऑक्टोबर 2020 मध्ये महाराष्ट्रात सर्वात आधी डबल म्यूटेशन आढळले होते, ज्यानंतर डेल्टा आणि कप्पा व्हेरिएंटबाबत माहिती मिळाली होती. यानंतर डेल्टा व्हेरिएंटवरून डेल्टा प्लस व्हेरिएंट समोर आला होता. आता डेल्टा-3 व्हेरिएंट समोर आल्यानंतर सर्व देशांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नवी दिल्लीतील आयजीआयबीचे शास्त्रज्ञ डॉ. विनोद स्कारिया (IGIB scientist Dr. Vinod
Scaria) यांनी सांगितले की, व्हायरसमध्ये म्यूटेशन झाल्यानंतर ए.वाय.3 व्हेरिएंट मिळाला आहे,
ज्यास डेल्टा-3 नाव दिले आहे. मागील दिल वर्षात भारतात 230 म्यूटेशन आढळले आहेत. यापैकी
सर्व नुकसानकारक नव्हते परंतु डेल्टा व्हेरिएंटने संपूर्ण देशात हाहाकार माजवला होता. डेल्टा
व्हेरिएंटमुळेच एप्रिल आणि मे महिन्यात कोरोना महामारी वेगाने पसरली होती, ज्यामधून देश अजूनही सावरलेला नाही.

2013 सॅम्पलमध्ये डेल्टा-3 (ए.वाय.3) ला दुजोरा

कोरोनाच्या डेल्टा-3 व्हेरिएंटचा धोका पाहता नुकतीच एक चाचणी करण्यात आली यामध्ये 90 टक्के
सॅम्पलमध्ये डेल्टा-2 व्हेरिएंट आढळला आहे. डेल्टा-2 व्हेरिएंटमुळेच दुसर्‍या लाटेने भारतात आक्रामक रूप घेतले होते.

यातून निघालेल्या इतर व्हेरिएंट बाबत बोलायचे तर जगभरात 348 सॅम्पलमध्ये डेल्टा प्लस, 628
मध्ये डेल्टा-2 (ए.वाय.2) आणि आता 2013 सॅम्पलमध्ये डेल्टा-3 (ए.वाय.3) ला दुजोरा मिळाला
आहे. हे सर्व आकडे जागतिक स्तरावर बनवलेल्या कोविड सिक्वेन्सिंगचे पोर्टल जीआयएसएआयडीवर आहेत.

हे देखील वाचा

Clubhouse यूजर्ससाठी वाईट बातमी ! डार्कवेबवर विकले जाताहेत 380 कोटी यूजर्सचे फोन नंबर !

Mann Ki Baat Today | ‘प्रत्येक नागरिकाने आज ‘भारत जोडो आंदोलना’चे नेतृत्व करावे’ – PM नरेंद्र मोदी

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Corona virus Delta-3 Variant | delta 3 variant of corona spreading rapidly around the world alert in india too

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update