Coronavirus : रेल्वेनंतर आता हवाई सेवांवर बंदी, उद्या रात्रीपासून ‘डोमॅस्टीक’ विमानांना स्थगिती

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – कोरोनाने देशात हाहाकार माजवला आहे, देश कोरोनामुळे भीतीच्या छायेत आहे. देशातील अनेक राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये तर कर्फ्यू लावण्यात आला आहे. या दरम्यान आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे देशांतर्गत ज्या विमानसेवा सुरु होत्या त्या बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा धोका पाहून हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.


मंगळवारी रात्री म्हणजे 24 मार्चपासून 12 वाजेनंतर उड्डाणांवर रोख लावण्यात आली आहे. असे असले तरी कार्गो विमानांवर बंदी नसेल. एअरलाइनला मंगळवारी रात्री 12 पूर्वी यावर उपाययोजना करण्याची तयारी करावी लागेल.

महाराष्ट्रात पुण्यात आणि मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात संचार बंदी लागू करण्यात आली आहे अशी माहिती देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे, असे असले तरी अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरु असणार आहेत. राज्यात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा धोका ओळखून देशात आंतरराष्ट्रीय विमानाने येण्यास देखील काही दिवसांपूर्वी बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या विमानावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आता देशातर्गंत विमान सेवांवर देखील बंदी आणण्यात आली आहे. ही सेवा कधीपर्यंत बंद असेल याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.