तीर्थक्षेत्र आळंदीत 8 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

आळंदी : पोलीसनामा ऑनलाइन – वाढत्या कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेत्र आळंदीमध्ये आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आळंदीकर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण शहरात सोमवार (दि. 6) पासून 13 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आळंदी लॉकडाऊ करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी नवल किशोर राम तसेच प्रांताधिकारी संजय तेली यांच्या आदेशानुसार घेण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.
आळंदीमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. आळंदीत लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आळंदी पोलीस ठाण्यातील सात पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर देहू फाट्यावर तीन रुग्ण आढळून आहेत.

शहरातील कोरोनाचा वाढता शिरकाव लक्षात घेता शहर बंदची ठेवण्याची मागणी स्थानिक प्रशासनाकडून केली होती. या अनुषंगाने राजगुरुनगर येथे शनिवारी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थित उपयायोजनांसाठी विशेष बैठक पार पडली. यामध्ये विशेष खबरदारी म्हणून कठोर पावले उचलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून आळंदी शहरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा तसेच लॉकडाऊन घोषित करण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी यांनी स्थानिक प्रशासनाला दिला.

या पार्श्वभूमीवर आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. शहरात बंदीच्या काळात बँक, पतसंस्था, हॉस्पिटल, मेडिकल तसेच अन्य अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहे. किराणा, दुकाने, भाजीपाला व दूध विक्री सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंतच सुरु ठेवता येणार आहेत. शहरात बंदीच्या काळात विवाह सोहळ्याला मज्जाव करण्यात आला असून मंगल कार्यालये बंद असणार आहेत. या काळात मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले असून विना मास्क आढळून आल्यास 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे.