कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सुद्धा अनेक लोकांमध्ये का दिसत नाही कोणतेही लक्षण? रिसर्चमध्ये समोर आली बाब

लंडन : वृत्त संस्था – कोरोना व्हायरस ( Corona Virus) च्या विध्वंसाला आता दिड वर्ष झाले आहे. कोरोनाची सामान्य लक्षणे काय आहेत, उपचार कसे केले जातात, कुणाला जास्त धोका आणि कुणी सावध राहावे यावर आजपर्यंत भरपूर चर्चा झाली आहे. परंतु, आजपर्यंत एक गोष्ट थेटपणे समोर आलेली नाही की काही रूग्ण असिम्पटोमेटिक का होतात. त्यांच्यात लक्षणे का दिसत नाहीत? उलट, असे लोक कोरोना ( Corona Virus) पसरवण्याचे मोठे कारण ठरतात. आता युनायटेड किंग्डमच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये एक रिसर्च झाला आहे. ज्यामध्ये यास जीन सर्वात मोठे कारण असल्याचे म्हटले आहे आणि याचा संबंध थेट व्हिटॅमिन डी च्या कमतरतेकडे इशारा करत आहे.

असे अनेक लोक आहेत ज्यांचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो आणि आरटी-पीसीआर टेस्टमध्ये त्यांचा सीटी-स्कोअर सुद्धा खुप कमी असतो,
परंतु तरी सुद्धा त्यांना काहीही होत नाही.
त्यांच्यात कोणतेही लक्षण नसते आणि पूर्णपणे निरोगी वाटतात.
कोविडचे असे रूग्ण संसर्ग पसरवण्यासाठी खुप धोकादायक मानले जातात.

कारण, लोक नकळत त्यांच्या संपर्कात येऊ शकतात.
आणि ते सुद्धा नकळत कुणालाही जोखीममध्ये टाकू शकतात.
प्रश्न हा आहे की, चीनमध्ये जन्मलेला हा व्हायरस वेगवेगळ्या लोकांसोबत वेगवेगळ्या पद्धतीने का वागतो? यूकेच्या न्यूकॅसल युनिव्हर्सिटीने याचा प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

जीनमुळे असिम्टोमिटिक होतात लोक
एचएलए जर्नलमध्ये प्रकाशित शोध दि इन्फ्लूएन्स ऑफ एचएलए जीनोटाईप ऑन द सीव्हेरिटी ऑफ कोविड-19 इन्फेक्शननुसार यासाठी ’एचएलए-डीआरबी1*04:01’ जीन जबाबदार आहे. रिसर्चनुसार हाच जीन असिम्पटोमेटिक लोकांना कोविड-19 च्या विरूद्ध सुरक्षा देतो.

व्हॅक्सीनेशनमध्ये कुणाला प्राथमिकता द्यावी
या स्टडीचे सहलेखक डॉक्टर कारलोस एकव्हॅरिया यांनी म्हटले,
ही एक महत्वाची माहिती आहे, ज्यामधून समजू शकते की,
काही लोक कोविड पॉझिटिव्ह होऊनही आजारी का पडत नाहीत.
याद्वारे आम्ही जेनेटिक टेस्टच्या दिशेने पुढे जाऊ शकतो, ज्यातून आम्हाला संकेत मिळू शकतो की, भविष्यात व्हॅक्सीनेशनसाठी कुणाला प्राथमिकता देण्याची आवश्यकता आहे.

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे गंभीर कोविडचा धोका
संशोधनात म्हटले आहे की, मनुष्यात आढळलेला ल्युकोसाईट अँटीजन जीन ’एचएलए-डीआरबी1*04:01’ अक्षांश आणि देशांतराशी थेट प्रकारे संबंधीत आहे.
याच्यानुसार या जीनसाठी जियोलोकेशन सुद्धा खुप महत्वाची भूमिका पार पाडते आणि उत्तर आणि पश्चिम यूरोपच्या लोकांमध्ये याच्या उपस्थितीची शक्यता जास्त आहे.

तर वाढते कोविडची जोखीम
या स्टडीचे लेखक डेव्हिड लँगटन म्हणाले, हा पर्यावरण, आनुवंशिकता आणि रोगामधील गुंंतागुंतीच्या संबंधावर जोर देतो.
आम्हाला माहिती आहे की, काही एलएचए जीन व्हिटॅमिन डी साठी जबाबदार असतात आणि याचा अर्थ व्हिटॅमिन डी कमी असल्यास गंभीर कोविडची जोखीम आहे.
आणि याबाबत आणखी पुढे काम करत आहोत.

हे देखील वाचा

WHO चा भारताला इशारा ! डेल्टा व्हेरिएंटचा उल्लेख करून म्हटले – ‘घाईगडबडीत हटवू नयेत प्रतिबंध’

शिरूर महसुल अधिकाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा करणारा वाळु तस्कर अखेर LCB कडून अटकेत; 7 महिन्यापासून होता फरार

फेसबुक पेज लाईक करा

ट्विटर ला देखील फॉलो करा

Web Title : corona virus explained why many people don t have any symptoms after being covid positive gene is the cause study