विदेशी कंपन्यांची चीनमधील स्टोअर्स बंद, उड्डाणे केली रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संसर्गजन्य रोगाचा मुकाबला करताना चीनसमोर नवनवीन समस्या उभ्या राहू लागल्या आहेत. हुबेई प्रांतातील राजधानी वुहान शहरात कोरोनाचे थैमान चालू आहे. येथूनच हा संसर्ग जगभर पसरत गेला आहे. वुहानमध्ये संसर्गाने अनेक बाधीत असून २४ जणांचा मृत्यू झाला आहे. येथील विदेशी कंपन्यांनी आपला पसारा आवरता घ्यायला सुरुवात केली आहे.

अॅपल आणि स्टार बक्सने दुकाने बंद केली आहेत. शिवाय विमान फेऱ्या रद्द केल्या आहेत. जपाननेही विमान प्रवास नियंत्रित केला आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँक, सॅमसंग, फोक्सवॅगन, एलजी, ऑस्ट्रेलियन ओरीएंटल बॅंकेने वुहानमधील कर्मचाऱ्यांना घरी बसूनच जमेल तेवढे काम पुढील दहा बारा दिवस करा असा सल्ला दिला आहे. होंडा कंपनीने ५० कर्मचारी वुहान मधून हलविले आहेत. अनेक कंपन्या कारभार नियंत्रित करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा