धक्कादायक ! गुजरातच्या साबरमती नदीत सापडला कोविड-19 व्हायरस, तपासणीत सर्व नमुने आढळले संक्रमित

अहमदाबाद : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसच्या Corona virus दुसर्‍या लाटेचा परिणाम आता हळुहळु कमी होऊ लागला आहे, परंतु संकट अजूनही पूर्णपणे टळलेले नाही. कोरोनाबाबत दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आता असेच एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, येथील सर्वात महत्वाच्या साबरमती नदीत Sabarmati river कोरोना व्हायरस आढळला आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegramfacebook page and Twitter for every update

गुजरातमधील Gujarat अहमदाबादच्या अगदी मधून जाणार्‍या साबरमती नदीच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले होते, ज्यापैकी सर्वांमध्ये कोरोना संसर्ग आढळून आला आहे.

इतकेच नव्हे, साबरमती नदीसह अहमदाबादमधील दोन मोठ्या तलावात (कांकरिया, चंदोला) सुद्धा कोरोना व्हायरसची लक्षणे आढळून आली आहेत. साबरमतीच्या अगोदर गंगा नदीत सुद्धा वेगवेगळ्या सीव्हेजमध्ये कोरोना व्हायरस Corona virus आढळला होता, परंतु आता नैसर्गिक जलस्त्रोतात अशा प्रकारे कोरोनाची लक्षणे सापडल्याने चिंता प्रचंड वाढली आहे.

Pune City | पुणे शहरात मध्यम स्वरुपाच्या पावसातही 9 झाडपडीच्या घटना

आयआयटी गांधीनगरने IIT Gandhinagar अहमदाबादच्या साबरमती नदीतून पाण्याचे नमूने घेतले होते. याचा अभ्यास करण्यात आला, प्रोफेसर मनीष कुमार यांच्यानुसार, तपासणीदरम्यान पाण्याच्या नमून्यात कोरोना व्हायरसच्या अस्तित्वाचा शोध लागला आहे, जे भयंकर धोकादायक आहे.

दर आठवड्याला घेतले होते नमूने
या रिसर्चबाबत आयआयटी गांधीनगरच्या पृथ्वी आणि विज्ञान विभागाचे प्रोफेसर मनीष कुमार यांनी सांगितले की,
पाण्याचे हे सॅम्पल नदीतून 3 सप्टेंबरपासून 29 डिसेंबर 2020 पर्यंत दर आठवड्याला घेतले गेले होते.
सॅम्पल घेतल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात आली असता कोरोना व्हायरसचे Corona virus संक्रमित जीवाणू आढळले.

देशातील सर्व जलस्त्रोत तपासावे
या संशोधकांचे म्हणणे आहे की, व्हायरस नैसर्गिक पाण्यात सुद्धा जिवंत राहू शकतो.
यासाठी देशातील सर्व नैसर्गिक जलस्त्रोतांची तपासणी झाली पाहिजे.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत व्हायरसचे अनेक गंभीर म्यूटेशन सुद्धा पहायला मिळाले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegramfacebook page and Twitter for every update

Web title : corona virus found in gujarat sabarmati river iit gandhinagar research

हे देखील वाचा

Mansukh Hiren Death Case | प्रदीप शर्मांनंतर आता NIA कोणावर करणार कारवाई?

Pune News | गावकर्‍यांना अंधारात ढकलून डीपीमधील 700 किलो तांब्याच्या तारा चोरणारे चोरटे अटकेत

नारायण राणेंचा CM ठाकरेंना थेट सवाल, म्हणाले – ‘मुख्यमंत्री, हीच का उपकाराची परतफेड?’