‘कोरोना’ व्हायरसनं दिली भारतीय पिचकारीला ‘संजीवनी’, ‘चायनीज’ बाजारातून ‘गायब’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे यंदाची होळी ही चायनीज पिचकारी नव्हे तर भारतीय पिचकाऱ्यांनी खेळली जाणार आहे. या व्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन स्थानिक दुकानदारांनी चिनी पिचकारी विकण्यासाठी मागवल्याच नाहीत. याचा परिणाम असा आहे की, मेड इन इंडिया च्या पिचकाऱ्यांनी बाजारपेठ व्यापली जाणार आहे आणि यांची गुणवत्ता ही चायनीज पिचकाऱ्यांपेक्षा उत्तम असून त्याची किमंत चायनीज पिचकारी एवढीच असणार आहे.

या वर्षी १० मार्च रोजी धूलिवंदन आहे. होळी चा सण जवळ आल्यामुळे दुकानदारांनी आपले दुकानात पिचकाऱ्या ठेवायला सुरुवात केली आहे. या भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्या नोएडा, गुडगाव येथे तयार केल्या गेल्या आहेत. अस्वल पिचकारी, महाराजा पिचकारी, बेडूक टॅंक, पांडा टॅंक, थ्रीडी सिंघम टॅंक इत्यादी पिचकाऱ्या बाजारपेठेत उपलब्ध असून, त्याची किमंत ही ५० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत असणार आहे.

होळीतील गिफ्ट पॅक मुळे, येणार रंगत
दिवाळीच्या धर्तीवर भारतीय रंगकर्मींनीही आकर्षक रंग सादर केले आहेत. हे गिफ्ट पॅकेट बाजारात वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत. यात चंदनाचे पात्र, पॉकेट परफ्युम, गुलाल टीका, गुलाब पाकळ्या इत्यादींचा समावेश आहे. यात कलर बार, सात्विक, बटर, वेलकम इत्यादींची नावे गिफ्ट पॅकमध्ये ठेवली गेली आहेत. या सर्वांमध्ये हर्बल रंगास प्राधान्य दिले गेले आहे.

दिवाळीप्रमाणेच होळीमध्ये सुद्धा पाऊस आणि माळेचा घेता येणार आनंद
दिवाळीसाठी दक्षिण भारताच्या शिवकाशी जिल्ह्यात फटाके बनवले जातात. यावेळी होळीच्या दिवशी शिवकाशी जिल्ह्याचा रंग प्रयागराजमध्ये पाहायला मिळणार आहे. फटाक्यांकरिता प्रसिद्ध शिवकाशी येथून रंगीबेरंगी पाऊस, माळा इत्यादींचा मोठा माल यावेळी पाठविण्यात आला आहे. नऊ रंगांच्या रॅम्बो फॉगचा देखील यात समावेश आहे.