Coronavirus : भारतात इटलीसारखा पसरतोय ‘कोरोना’, परंतु वेगळी परिस्थिती थांबवू शकते ‘नाश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतात आतापर्यंत कोरोना विषाणूच्या 5734 रुग्णांची नोंद असून 166 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, माहितीनुसार, भारतात कोरोना विषाणूची प्रकरणे आणि मृत्यूचे प्रमाण इटलीप्रमाणेच वाढत आहेत. फरक आहे तो फक्त वेळेचा गेल्या मार्च महिन्यात इटलीमध्ये कोरोनाच्या घटनांसह मृत्यूची संख्या वाढत होती, भारतातही अशीच प्रकरणे वाढत आहेत. माहितीसाठी एक एप्रिल रोजी भारतात 1,998 रुग्ण आढळले होते. तर 58 जणांच्या मृत्यूची नोंद होती. तर 1 मार्चला इटलीचा आलेख पाहिला तर त्यात 1577 प्रकरणांची नोंद होती तर मृतांची संख्या 41 होती.

त्यांनतर 7 एप्रिलपर्यंत भारतात कोरोनाची एकूण 5916 प्रकरणे आणि 160 मृत्यूची नोंद होती. त्याचप्रमाणे 7 मार्च रोजी इटलीमध्ये कोरोनाचे एकूण 5883 रुग्ण आढळले, तर एकूण 233 मृत्यू झाले. इटली आणि भारतात दररोज होणाऱ्या प्रकरणांमध्ये फारसा फरक नाही. आकडेवारी जरी वेगळी असली तरी रोगाची तीव्रता जवळजवळ समान आहे. तसेच, बरे झालेल्यांची आकडेवारी पहिली तर 1 मार्च रोजी इटलीमध्ये 33 जण, तर 1 एप्रिल रोजी भारतात 25 लोक बरे झाले. तसेच इटलीमध्ये 7 मार्च रोजी बरे होण्याचे प्रमाण 66 होते आणि भारतात 93 होते.

दरम्यान, ही प्रकरणे भारतात कमी असल्याची तीन कारणे तज्ज्ञ देतात. पहिली म्हणजे कोरोना तपासणी येथे कमी होते. दुसरे, लवकरच लॉकडाउनची अंमलबजावणी. तिसरे, भारतीय लोकांना दिली गेलेली बीसीजी लस. देशाची लोकसंख्या जवळपास 130 कोटी आहे. पण ज्या प्रकारे तपास केला जात आहे. ते पुरेसे नाही. 6 एप्रिलपर्यंत भारतात 85 हजार चाचण्या घेण्यात आल्या. म्हणजेच भारतातील एक लाख लोकसंख्येवर 6.5 चाचण्या घेतल्या जातात. तपासणीअभावी कोरोनामुळे संक्रमित लोकांच्या संख्येचा योग्य अंदाज येऊ शकत नाही.

डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, भारताने योग्य वेळी लॉकडाउन लादला. म्हणूनच, भारत अद्याप कोरोना विषाणूच्या दुसऱ्या आणि तिसर्‍या टप्प्यात आहे. चीन, अमेरिका किंवा युरोपियन देशांपेक्षा भारतात कोरोना विषाणूची गती कमी आहे. भारतात कोरोना व्हायरस एका महिन्यापासून दुसर्‍या टप्प्यावरच असून तो अद्याप तिसर्‍या टप्प्यात पोहोचलेले नाही. ज्याला कम्युनिटी ट्रान्समिशन फेज म्हणतात. अमेरिकेत, कोरोनाव्हायरसची प्रकरणे 10 दिवसांत 1000 ते 20 हजारांवर पोहोचली आहेत.

तसेच बीसीजी लस भारतीय लोकांना वाचावीत आहे. असे मानले जाते की, भारतासह जगातील ज्या देशांमध्ये दीर्घ काळापासून बीसीजी लसीकरण केले जात आहे. तेथे कोरोना विषाणूचा धोका कमी आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) देखील या प्रकरणावर विचार करत आहे. बीसीजीची लस भारतात 72 वर्षांपासून दिली जाते. अमेरिका आणि इटलीसारख्या देशांमध्ये बीसीजीची लस देण्याचे धोरण नाही. म्हणून, कोरोनाची अधिक प्रकरणे आणि मृत्यू देखील वाढत आहेत.

बीसीजीचे पूर्ण नाव बेसिलस कामेट गुएरिन आहे. टीबी आणि श्वसन रोग रोखण्यासाठीची ही एक लस आहे. बीसीजी जन्मानंतर सहा महिन्यांच्या दरम्यान दिला जातो. वैद्यकीय शास्त्रानुसार बीसीजी लस बॅक्टेरियाविरूद्ध प्रतिकारशक्ती प्रदान करते. ज्यामधून ते बॅक्टेरियांच्या हल्ल्याला सामोरे जाऊ शकते. दरम्यान, कोरोना एक विषाणू आहे, बॅक्टेरिया नाही.