कौतुकास्पदः कोरोनाच्या उद्रेकातही पुणे जिल्ह्यातील 48 गावात आढळला नाही एकही कोरोनाग्रस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – संपूर्ण जगभरात कोरोना(Corona )ने थैमान घातले आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील 48 गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले. या गावात पहिल्या अन् दुसऱ्या लाटेत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही. यातील बहुतेक सर्व गावे दुर्गम भागातील आहेत. गावातील गावक-यांच्या एकजुटीमुळे कोरोनाने शिरकाव केला नाही. गावक-यांनी आरोग्याबाबत पुर्ण दक्षता घेतल्याचे गावक-याकडून सांगितले जात आहे. दरम्यान जिल्ह्यातील 442 ग्रामपंचायती आज अखेर कोरोना मुक्त झाल्या आहेत.

राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुणे जिल्ह्यात 9 मार्च 2020 मध्ये आढळल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली होती. त्यानंतर एक महिन्यातच कोरोना(corona)चा प्रादुर्भाव शहरी भागातून ग्रामीण भागात पसरला. त्यानंतर पहिल्या लाटेत ऑक्टोबर, सप्टेंबर महिन्यात संपूर्ण ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव वाढला. तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर हजारो गावे कोरोनाच्या विळख्यात सापडली. जिल्ह्यातील 1355 ग्रामपंचायतीमध्ये कोरोनाची बाधा झाली.

मात्र 48 गावात कोरोनाने शिरकाव केला नाही. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने हळूहळू गावे देखील कोरोना मुक्त होत आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आतापर्यंत 2 लाख 60 हजार कोरोना बाधित रुग्ण आहेत. त्यातील दोन लाख 21 हजार 653 रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी सोडले आहे. सद्यस्थितीत 30 हजारांपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत.

Also Read this : 

SBI घरबसल्या देत आहे या खास सुविधा, मुलांना मिळेल थेट फायदा; जाणून घ्या कसा

Corona Side Effects : रिसर्चमध्ये दावा – कोरोनातून बरे झालेल्या 14% रूग्णांना होत आहेत नवीन आजार

कोरोनाशी लढा : आज मिळणार 2-डीजी औषधाचा 10 हजार पाऊचवाला दुसरा साठा

Cocktail Drug in India : आजपासून मिळू शकते कॉकटेल ड्रग, केवळ एक डोसने होईल कोविडचा उपचार, जाणून घ्या किंमत

1 जूनपासून बदलणार हे नियम, ज्यांचा होईल तुमच्यावर परिणाम; बँक व्याजदर आणि एलपीजीच्या दरात सुद्धा होणार का बदल?