Corona : हाय BP च्या रूग्णांनी ‘या’ 6 गोष्टींची काळजी घेतली तर कोरोना काळामध्ये होणार नाही अडचण; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरस हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी जास्त धोकादायक ठरत आहे. भारतात असेही हाय ब्लड प्रेशरला धोकादायक आजार मानले जाते, हा आजार हृदय, किडनी, ब्रेनशी संबंधी धोका वाढवतो. डॉक्टर म्हणतात कोरोनाच्या रिकव्हरी काळात 5 ते 10 दिवसांचा काळ अतिशय गंभीर असतो, या दरम्यान ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवणे आवश्यक असते. यासाठी कोणत्या 6 गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून घेवूयात…

डाएट-

हेल्थ एक्सपर्ट सांगतात, कोरोनात हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी डाएटची जास्त काळजी घेतली पाहिजे. पोटॅशियम युक्त फळे-भाज्यांचे सेवन करावे. संत्रे, केळे, पालक, ब्रोकली यांचे सेवन लाभदायक ठरते.

सोडियम-

हायपर टेन्शनच्या रुग्णांनी जेवणात मीठ कमी खावे. पॅकेट बंद फूड किंवा कॅन सूप सारखे पदार्थ टाळावेत.

झोप-

झोपेचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. यासाठी रोज 8 तास झोप घ्यावी. 8 तासांची योग्य झोप ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी खुप उपयोगी ठरते.

हेल्थ चेकअप आणि जेनेटिक टेस्ट-

कुटुंबात कुणा व्यक्तीला असा आजार असेल तर अनुवांशिक कारणाने सुद्धा हायपरटेंशनचा आजार होऊ शकतो. जेनेटिक टेस्ट केल्याने ओव्हरऑल हेल्थ कंडीशन समजू शकते. या आजाराचा परिणाम डोळे, किडनी आणि हृदयावर होतो. एक फुल बॉडी चेकअप सुद्धा आवश्य करून घ्या.

नियमित औषधांचे सेवन करा-

हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी नियमित आपल्या औषधांचे सेवन करावे. ब्लड प्रेशर नॉर्मल असले तरी औषध सोडू नये.

स्टेरॉईड-

कोरोनाच्या हाय ब्लड प्रेशर रूग्णांची प्रकृती जर जास्त बिघडली तर त्यांना डॉक्टरच्या सल्ल्याने स्टेरॉईड दिले जाऊ शकते. मात्र, लवकर रिकव्हरीच्या प्रयत्नात हायपरटेंशनच्या रूग्णांना असे ड्रग किंवा स्टेरॉईड चुकूनही देऊ नका. याच्या फायद्यापेक्षा नुकसान जास्त होण्याची शक्यता असते.