Coronavirus : घशातील ‘खवखव’ आणि ‘सूज’ असू शकतं ‘कोरोना’चं इन्फेक्शन, ‘या’ पध्दतीनं करा बचाव, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन :  जगभरासह महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणूचे संक्रमण झपाट्याने पसरत आहे. तसेच वातावरणात घडत असलेल्या बदलांमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. कोरोनाची लक्षणे काय आहेत? हे तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल. त्यात सर्दी, खोकला आणि तापासह गळ्याच्या समस्येचा देखील समावेश होतोय.

कोरोनापासून वाचण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. आपण गळ्याच्या समस्येकडे लक्ष देणेही आवश्यक आहे. त्यामुळे आपण घशाची समस्या कशी दूर करायची? हे जाणून घेऊ. काही घरगुती उपायांचा वापर करून तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता.

घशाची खवखव ही संसर्गजन्य असते आणि एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला होण्याचीही शक्यता देखील असते. हा त्रास असणार्‍या व्यक्तीच्या शिंकण्यातून, खोकण्यातून किंवा थुंकीतून विषाणू किंवा बॅक्टेरिया पसरतात. या व्यक्तीने वापरलेल्या वस्तूंमुळे दुसर्‍या व्यक्तीला हा त्रास होऊ शकतो. विषाणूचं इन्फेक्शन आणि वातावरणात होत असलेले बदल, बोलण्यासाठी त्रास होणे, घशाला सूज येणे, अशा समस्या उद्भवतात.

कोरोना झाला तर त्याची सुरूवातीची लक्षणे देखील अशीच आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये, या लहान समस्या वाढू न देता कमी वेळातच वैद्यकीय सल्ला घेतल्यास पुढील मोठी समस्या टळता येऊ शकते. त्यामुळे आरोग्य चांगले ठेवणं आवश्यक आहे. घशाची खवखव टाळायची असल्यास तुम्ही हा त्रास होत असलेल्या लोकांपासून दूर राहा. कारण, हा त्रास संसर्गजन्य आहे. जर तुम्हाला हा त्रास जाणवू लागला तर हात आणि शरीराची स्वच्छता ठेवा. संसर्गजन्य आजार होत असल्यामुळे यात स्वच्छता खूप बाळगणे आवश्यक आहे. यासाठी वेळोवेळी हात धुणे, स्वच्छ कपडे परिधान करणे, तसेच नेहमी रूमाल बाळगणे. पाणी भरपूर पिणे.

घसा दुखण्यावर घरगुती उपाय : हळद
हळदीचे अनेक औषधी गुण आहेत. रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा हळदीचे सेवन करणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही हदीचे दुध प्या. त्यामुळे घशातील खवखव कमी होण्यासह इतर आजार दूर होण्यास मदत होईल. हळदीसोबत गुळाचे सेवन कराल तर घसा दुखण्याची समस्या कमी होईल.याशिवाय वेलदोडा दाणे आणि साखर एकत्र चघळा. बसलेल्या घशावर कोमट केलेल्या मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करण्यानेही घसा दुखणे आणि घसा बसण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.

मेथीच्या बीया
घशाच्या खवखवीवर घरगुती उपाय करताना तुम्ही मेथीचे दाणे किंवा मेथी घातलेला चहा पिणेही लाभदायक आहे. संशोधनात आढळले आहे की, मेथी ही घसा दुखीपासून आराम देण्यासाठी गुणकारी आहे. ही घशातील बॅक्टेरियांचा नाश करते तसेच यातील अँटीफंगल गुणांमुळे घशाची सूज आणि जळजळ कमी होते.

औषधी काढा
घशाच्या दुखण्यासाठी औषधी काढा करून प्यावा. नुसत्या काळ्या मिरीचे सेवन केल्यानेही घशाला आराम मिळतो. काळी मिरी, बत्तासा, लवंग, तुळस घालून पाणी उकळवा. सुरूवातीचे पाणी उकळून निम्म्याने कमी झाले की हा काढा पिण्यायोग्य होतो. या काढ्याने घशाची खवखव निघून जाईल आणि घशाला आराम मिळेल. हे उपाय करून पाहिले तर कोरोनाच्या इन्फेक्शनपासून दूर राहू शकाल.