Coronavirus Impact : शेअर बाजारात ‘कोरोना’ची दहशत वाढली, फक्त 3 दिवसात गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी बुडाले

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – जगभरात कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. यातून शेअर बाजार देखील सावरु शकला नाही. या आठवड्यात तीन दिवसात सेंसेक्स 5000 अंकांनी गडगडला. तर निफ्टी 1500 अंकांनी गडगडला.

बुधवारी शेअर बाजार सुरुवातीला चढता होता. दिवसाच्या सुरुवातीला सेंसेक्स 400 अंकानी मजबूत होऊन 31 हजार अंकावर पोहोचला. निफ्टी देखील 100 अंकानी वधारुन 9 हजार अंकांवर स्थिरावला. परंतु काही तासात सेंसेक्स निफ्टी कोसळण्यास सुरुवात झाली. दिवसाअखेर सेंसेक्स 1900 अंकांनी कोसळून 29 हजारावर आला. तर निफ्टी 460 अंकांनी घसरुन 8500 अंकांवर स्थिरावला होता.

दिवसाच्या अंती सेंसेक्स 1709.58 अंक म्हणजेच 5.59 टक्क्यांनी घसरुन 28,869.51 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 425.55 अंक किंवा 4.75 टक्क्यांनी घसरुण 4,541.50 अंकावर आला. निफ्टीची ही 3 वर्षातील सर्वात मोठी निच्चांकी आहे.

3 दिवसात 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान –
आठवड्याच्या तीन दिवसात गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बीएसई इंडेक्सवर मार्केट कॅप सोमवारी 1,21,63,952.59 कोटी रुपये होती परंतु बुधवारी बाजार बंद होताना 1,13,64,118.31 कोटी रुपये झाली. यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.

सुरुवातीचे दोन दिवस –
मंगळवारी देखील सेंसेक्स निफ्टीमध्ये घसरणं दिसून आली. दिवसाच्या अखेरीस सेंसेक्स 810.98 अंक म्हणजे 2.58 टक्क्यांनी कोसळून 30,579.09 अंकांवर बंद झाले. निफ्टी 230.35 अंकांनी घसरुन 8,967.05 अंकांवर बंद झाला. सोमवारी सेंसेक्स 2.713.41 अंकांनी म्हणजे 7.96 टक्के घसरुन 31,390.07 अंकांवर बंद झाला.एनएसईच्या निफ्टीमध्ये 757.80 अंकानी म्हणजे 7.61 टक्क्यांनी कोसळला आणि 9,197.40 अंकावर बंद झाला.

अमेरिकी शेअर बाजारात 3 दशकातील सर्वात मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजार सावरताना दिसला. 1987 नंतरची सर्वात मोठी घसरणं अमेरिकी शेअर मार्केटमध्ये पाहायला मिळाली होती. फिलीपिनने तर आपला शेअर बाजार कोरोनाच्या भीतीमुळे बंद केला आहे. कच्चे तेल देखील 30 डॉलर प्रति बॅरल स्वस्त झाले. बुधवारी रुपया मात्र डॉलरच्या तुलनेत काही अंशी मजबूत होताना दिसला.