COVID-19 : चिंताजनक ! ‘कोरोना’ संसर्गाच्या प्रकरणांमध्ये जगात तिसर्‍या स्थानावर पोहचला भारत, रशियाला टाकले मागे, जाणून घ्या आकडेवारी

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसची प्रकरणे सतत वाढत चालली आहेत. जगभरात सर्वात जास्त केस असलेल्या देशांच्या यादीत भारत आता तिसर्‍या स्थानावर पोहचला आहे. रशियाला मागे सोडून भारत कोरोना संक्रमितांच्या संख्येत तिसर्‍या स्थानावर आहे. मात्र, अजूनही अमेरिका आणि ब्राझील याबाबतीत भारताच्या पुढे आहेत. पाकिस्तान 12व्या स्थानावर आहे.

भारतात सध्या 687,760 कोरोना रूग्ण आहेत, तर रशियात आतापर्यंत 681,251 संक्रमित केस समोर आल्या आहेत. मागील 24 तासात देशात 13 हजारपेक्षा जास्त केसची नोंद झाली आहे. या दरम्यान एकुण 13,856 प्रकरणे नोंदली गेली.

तर रशियामध्ये आता 681,251 केस आहेत, ज्यामध्ये मागील 24 तासात 6,736 प्रकरणे समोर आली आहेत. तिसर्‍या स्थानावर पोहचलेल्या भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका आणि ब्राझील आहे. मात्र, या देशांमध्ये कोरोना संसर्गाच्या केस भारताच्या एकुण संसर्गाच्या केसच्या तुलनेत दुप्पटीपेक्षा कितीतरी जास्त आहेत.

कोरोना महामारीने अमेरिका सर्वाधिक त्रस्त आहे. तेथे आतापर्यंत 29 लाखांपेक्षा जास्त म्हणजे 2,953,014 प्रकरणे समोर आली आहेत. मागील 24 तासात 17,244 नव्या केस समोर आल्या आहेत. अमेरिकेत आतापर्यंत 132,382 लोकांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेनंतर ब्राझीलचा नंबर येतो आणि तेथे 1,578,376 कोरोना केस समोर आल्या आहेत, तर यापैकी 64,365 लोकांचा मृत्यू झाला आहे. तिसर्‍या स्थानावर पोहचलेल्या भारतात एकुण 687,760 केस नोंदल्या गेल्या आहेत. ज्यापैकी 19,568 लोकांनी आपला जीव गमावला आहे.

रशियात सध्या 681,251 कोरोना केस आहेत, ज्यापैकी 10,161 लोकांचा मृत्यू झाला आहे. काही काळापूर्वी युरोपमध्ये जोरदार विध्वंस करणारी ही महामारी आता तेथे थोडी शांत झाली आहे. युरोपमध्ये रशियात सर्वात जास्त महामारी पसरली आहे. रशियानंतर स्पेन (6 वे स्थान), इंग्लंड (8वे स्थान) आणि इटली (10वे स्थान) या प्रमुख 10 देशांचा समावेश आहे.

टॉप 10 देशांमध्ये युरोप आणि दक्षिण अमेरिकेचे 4-4 देश सहभागी आहेत. दक्षिण अमेरिकन देशांमध्ये ब्राझीलनंतर पेरू (5 वे स्थान), चिली (7 वे स्थान) आणि मेक्सिको (9वे स्थान) हे प्रमुख 10 देशांमध्ये आहेत. तर पाकिस्तानमध्ये 228,474 केस समोर आल्या आहेत आणि तो या यादीत 12व्या नंबरवर आहे. इराण 11 व्या स्थानावर आहे, जेथे 240,438 केस समोर आल्या आहेत. ज्यामध्ये 11,571 लोकांचा मृत्यू झाला आहे. प्रमुख 12 देशांच्या यादीत भारतासह आशियातील 3 देशांचा समावेश आहे.