केवळ चीनच्या ‘या’ चुकीमुळं फोफावतोय ‘कोरोना’ व्हायरस, जाणून घेतल्यावर अंगावर येतील ‘शहारे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनने एक अशी चूक केली की ज्याचा परिणाम जगाला सोसावा लागत आहे. चीन वुहान शहरापासून पसरण्यास सुरु झालेला हा जीवघेणा व्हायरल चीनच्या चूकीमुळे पसरला. कोरोना व्हायरस पसरण्याला आता चीन सरकार आणि आरोग्य अधिकाऱ्यांना जबाबदार ठरवले जात आहे.

माहिती मिळत आहे की, वुहानमध्ये एका रुग्णालयातील डॉक्टर ली. वेनलियांन यांनी 30 डिसेंबरला 7 रुग्णांना या आजाराने बाधित असल्याचे पाहिले होते. त्यानंतर त्यांनी सतर्कता बाळगत या रुग्णांना तात्काळ आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्याचे आदेश दिले. या व्हायरसची माहिती देणाऱ्या या डॉक्टरांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना चुकीचे ठरवत त्यांची एका दस्तावेजावर स्वाक्षरी घेतली.

कोरोना व्हायरसचे मूळ वुहान शहरातील ते मार्केट सांगितले जात आहे, जेथे जवळपास 112 प्रकारच्या जनावरांचे मांस विकले जाते. अशीही माहिती आहे की सडलेल्या मांसमुळे हा व्हायरस पहिल्यांदा सापाला झाला. यानंतर या सापांना खाल्यामुळे या व्हायरसने मानवी शरीरात प्रवेश केला.

अहवालानुसार, कोरोना व्हायरसचे पहिले प्रकरण डिसेंबरमध्ये समोर आले होते, परंतु सरकारने ते गंभीर्याने घेतले नाही. सरकारकडून कोरोना व्हायरसबाबतची पहिली माहिती जानेवारी महिन्यात देण्यात आली. त्यानंतर हा व्हायरस संपूर्ण देशात पसरला.

कोरोना व्हायरस पसरल्यानंतर चीनी सरकारने अधिकारी आणि डॉक्टरांना शांत राहण्यास दबाव टाकला. माहितीनुसार लोक या व्हायरसमुळे अनभिज्ञ राहिले आणि वेळीच आपल्यावर उपचार करु शकले नाहीत. वुहानमधील बाजाराला देखील ताळे ढोकण्यात आले आणि सांगण्यात आले की दुकानांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. असे सांगण्यात येत आहे की आरोग्य अधिकाऱ्यांकडून ही माहिती आधीच मिळाली असती तर या जीवघेण्या व्हायरसपासून अनेकांचे जीव वाचवता आले असते. अशीही माहिती आहे की पूर्वोत्तर भारतातील काही राज्यातील लोक देखील या व्हायरसमुळे बाधित झाले आहेत, जे चीन आणि थायलँडमध्ये वास्तवास होते.