Coronavirus : भारतामध्ये केली ‘कोरोना’वर मात, ब्रिटिश नागरिक म्हणाला – ‘UK मध्ये नाही झाले असते असे उपचार’

केरळ : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा सर्वाधिक प्रभाव केरळ राज्यात असून शनिवारी संध्याकाळपर्यंत इथे कोरोनाचे ३०६ रुग्ण समोर आले होते. आतापर्यंत राज्यात या आजाराने दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ५९ लोकं असेही आहेत, जे बरे होऊन रुग्णालयातून त्यांना सुट्टी मिळाली आहे.

कोरोनापासून बरे होणाऱ्यांमध्ये पठानमथिट्टाचे राहणारे सर्वात वयोवृद्ध दाम्पत्य थॉमस (वय ९३) आणि मारियाम्मा (वय ८८) हेही आहेत. केरळमध्ये ७ परदेशी नागरिक पॉजिटीव्ह आढळले होते आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना भरती केले गेले होते. यात ५७ वर्षाचे ब्रायन लॉकवुड हे ब्रिटिश नागरिक देखील होते.

ब्रायन आपल्या पत्नीसोबत १८ लोकांसह केरळ टूरवर आले होते. ब्रायन यांना दुबईची फ्लाईट पकडण्या अगोदर काही वेळेपूर्वीच रुग्णालयात भरती केले गेले होते. आठवड्याच्या उपचारानंतर ब्रायन यांना कलामास्सेरी मेडिकल कॉलेज रुग्णालयातून सुट्टी मिळाली. ब्रायन यांनी एका मुलाखतीदरम्यान आपला अनुभव सांगितला आहे.

ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी कोट्टायममध्ये ताप असल्यामुळे कोरोना चाचणी केली गेली होती. मी आणि माझ्या पत्नीने परत मुन्नारमध्ये हॉटेलमध्ये सेल्फ आयजोलेशन मध्ये ठेऊन चाचणीच्या निकालाची वाट पाहिली. १४ मार्चला आम्हाला सांगितले गेले कि टेस्ट निगेटिव्ह आली आहे. यानंतर आमच्या टूर पार्टीने दुसऱ्या दिवशी विमान पकडण्याचे ठरवले. मी विमानात चढत नाही तर मला सांगितले गेले कि माझी टेस्ट पॉजिटीव्ह आली आहे.

जेव्हा गेटवर माझे नाव घेतले गेले, मला भास झाला कि ते मला का बोलवत आहेत ? जेव्हा माझी पत्नी आणि मला पहिले होल्डिंग एरिया आणि रुग्णालयात नेले तेव्हा मला हेच वाटत होते कि मी निगेटिव्ह आहे. पण जेव्हा सत्य कळले तेव्हा घाबरून गेलो.

माझी आणि पत्नीची कोविड-१९ साठी वेगवेगळी चाचणी घेतली. आमचा एक्स-रे झाला, ज्यात मला निमोनिया असल्याचे दिसून आले. डॉ. फतेहुद्दीन आणि डॉ. याकूब यांनी लवकरच त्यांच्या टीमबरोबर उपचार सुरू केले. त्यांनी मला HIV औषधे किंवा इतर अँटीव्हायरल मधील पर्याय निवडण्यास सांगितले. नंतर त्यांनी मला व्हेंटिलेटरवर ठेवले. यामुळे मला रिकव्हर होण्यात खूप मदत झाली.

तेथील वातावरण कठोर होते, परंतु मला हे समजले की, व्हायरसचा प्रसार होण्यापासून रोखण्याची शक्यता कमी करण्यासाठी आहे. आयजोलेशन खोल्या नियमितपणे स्वच्छ केल्या गेल्या. ते एक स्थानिक रुग्णालय असल्याने, जेवण नेहमी पाश्चात्य अन्नानुसार नसते. परंतु मेडिकल टीमकडून नेहमी सांगितले जाते की, इतर कोणकोणते पर्याय उपलब्ध असतात. मेडिकल टीम वर्ल्ड क्लास होती. त्याचे सदस्य खरोखरच विनम्र, काळजी घेणारे आणि प्रोफेशनल होते. यापेक्षा चांगली देखभाल करू शकतात असे मला वाटत नाही.

मी ऐकलं आहे की, केरळमध्ये टॉप क्लास वैद्यकीय सेवा आहे जी माझ्या उपचारांद्वारे सिद्ध झाली आहे. मला असे वाटत नाही की, ब्रिटनमध्ये माझ्यावर यापेक्षा जास्त चांगले उपचार झाले असते. सर्व वैद्यकीय निर्णय योग्य वेळी घेतले गेले. मेडिकल टीम समर्पित होती कि रूग्णाच्या उपचारासाठी जास्तीत जास्त चांगले आहे, ते केले जावे. ते माझ्या पत्नीला माझ्या परिस्थितीबद्दल सतत सांगत होते. यामुळे माझ्या पत्नीलाही निश्चित राहण्यास मदत झाली.

आता माझ्यासाठी काय महत्त्वाचे आहे याविषयी माझा संपूर्ण दृष्टीकोन बदलला आहे. भौतिक गोष्टी नाही तर माझे कुटुंब आणि आरोग्य आता महत्त्वाचे आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की, सरकार जे मार्गदर्शक- तत्त्वे आणि सल्ला देत आहेत, त्यांना गंभीरपणे घ्या कारण ते आपल्या फायद्यासाठी आहे.

मी खूप नशीबवान आहे. माझी परिस्थिती वेगळी असती पण मला वेळेवर उपचार मिळाले. रुग्णालयात मेडिकल स्टाफ पूर्णपणे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटने सज्ज होता. त्यांच्या शरीराचा कोणताही भाग खुला नव्हता. सगळ्या रुग्णालयांनी आपल्या हेल्थ केअर स्टाफची अशीच काळजी घेतली पाहिजे.

यशस्वी उपचारानंतर ब्रायन व त्यांची पत्नी आता कोची येथे सरकारी सुविधेमध्ये राहत आहेत. १४ दिवस निगराणीखाली ठेवल्यानंतर, ते त्यांच्या देशात जाण्यास मोकळे होतील.