अमेरिकेतून तडकाफडकी भारतात आली खुशी कपूर, गाडीत बसताच लावलं ‘सॅनिटायजर’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम – अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रसारानंतर हेल्थ इमर्जंसी लागू केली आहे. यानंतर अनेक एज्युकेशनल इंस्टिट्युट्स आणि ऑर्गनायजेशन बंद करण्यात आल्या आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर काही वेळातच बोनी कपूर आणि खुशी कपूर एअरपोर्टवर दिसले. कदाचित इंस्टिट्युट्स बंद होण्यामुळंच खुशी घरी परतली असावी.

मुंबई एअरपोर्टमधून बाहेर पडतानाचा खुशी आणि बोनी कपूर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. बोनी कपूर खुशीला पिक करण्यासाठी आले होते. खुशी गाडी बसताच सॅनिटायजरनं हात स्वच्छ करताना दिसली. खुशीदेखील कोरोना पासून वाचण्यासाठी योग्य ती खबरदारी घेताना दिसत आहे. खुशी अमेरिकेतील न्यूयॉर्क फिल्म ॲकेडमीमध्ये शिक्षण घेत आहे.

https://www.instagram.com/p/B1gV9ScAmjJ/

खुशी कधी करणार बॉलिवूड डेब्यू ?
असं सांगितलं जात आहे की, लवकरच खुशी आपला बॉलिवूड डेब्यू करणार आहे. लवकरच ती हिंदी सिनेमात दिसण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. याआधी ती आपलं शिक्षण पूर्ण करणार आहे. चाहत्यांना मात्र तिच्या बॉलिवूड डेब्यूची मोठी आतुरता आहे असं दिसतंय.

https://www.instagram.com/p/BxmADJhDj9L/

https://www.instagram.com/p/Bvl3dMdgZfS/

https://www.instagram.com/p/Bvl2zSggHm8/

https://www.instagram.com/p/Bu-XNCfgNH4/