Coronavirus : चीनमध्ये आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू, जयपूरला परतलेला विद्यार्थी रुग्णलयात भरती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधील कोरोना व्हायरस आता अमिरेकेसोबत डझनभर देशात पसरला आहे. सर्व देश याला निपटण्यासाठी झगडताना दिसत आहेत. अशातच आता अशी बातमी समोर आली आहे की, कोरोना व्हायरसनं आता भारताचा दरवाजा ठोठावला आहे. रविवारी जयपूरमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण समोर आला आहे. असं सांगितलं जात आहे की, या मुलाला जयपूरमधील सरकारी रुग्णलयात भरती करण्यात आलं आहे. तो मुलगा चीनमध्ये शिक्षण घेत होता. भारतात आल्यानंतर त्या मुलामध्ये कोरोनाची लक्षणं पाहायला मिळाली. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चीमध्ये कोरोना व्हायरसनं मरणाऱ्या लोकांची संख्या 80 झाली आहे.

राजस्थानचे वैद्यकीय आणि आरोग्य मंत्री डॉ रघु शर्मा यांनी सवाई मान सिंह(एसएमएस) मेडिकल कॉलेज प्रशासनाला चीनमधून एबीए करून आलेला विद्यार्थी कोराना व्हायरस संक्रिमित आढल्यानंतर त्याला वेगळ्या वार्डात ठेवण्यासाठी आणि त्याच्या कुटुंबाच्या स्क्रिनिंगसाठी निर्देश दिले. शर्मांनी संशयित रुग्णाचे नमुने तात्काळ पुण्यातील व्हायरोलॉजी लॅबमध्ये पाठवण्यासाठी निर्देश दिले आहेत.

चीनमध्ये या व्हायरसनं मरणाऱ्या लोकांची संख्या 80 च्या घरात गेली आहे. तर संक्रमित लोकांची संख्या 2300 पर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे. हुबेईची राजधानी वुहान हे 1.1 कोटी लोकसंख्या असणारं शहर आहे. तरंच कोरोना व्हायरसच्या संक्रमाणाचं हे मुख्य केंद्र आहे. हुबेईच्या महापौरांनी रविवारी 56 लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे. 1975 लोकांच्या संक्रमाणाची पुष्टीही करण्यात आली आहे. यासोबतच शहरात 1000 नवीन रुग्ण असल्याचा अंदाजही आहे. महापौर झोऊ शियावांग यांनी या आकडेवारीचा दावा रुग्णालयातील रुग्णांचं परीक्षण आणि निगराणीत ठेवलेल्या लोकांच्या आधारावर केला आहे.

1000 आणखी आरोग्य कर्मचाऱ्यांना वुहानला पाठवण्याची तयारी

कोरोना व्हायरस इतर देशातही पसरताना दिसत आहे. अमेरिका, रशिया आणि फ्रान्स आपापल्या नागरिकांना तेथून मुक्त करण्यासाठी तयारी करत आहेत. देशातील संक्रमण रोखण्यासाठी संशयितांना वेगळ्या ठिकाणी ठेवण्याची पर्यायी व्यवस्था केली जात आहे. शहरांना बंद करण्यासोबतच अधिक प्रमाणात डॉक्टर आणि नर्स वुहानला पाठवले जात आहेत. 1350 आरोग्य कर्मचारी वुहानला पाठवण्यात आले आहेत. आणखी 1000 आरोग्य कर्मचाऱ्यांना पाठवलं जात आहे.

शी जिनपिंग यांनी कोरोनाला हवण्याचा विश्वास दिला

देशातील स्थिती गंभीर होताना पाहून राष्ट्रपती शी जिनपिंग म्हणाले, “चीन एका गभीर स्थितीचा सामना करत आहे. चीन कोरोनाविरुद्धची ही लढाई जिंकणार आहे. राार्स सारख्या या आजाराचे संक्रमण रोखण्यासाठी आम्ही चौफेर प्रयत्न करत आहोत. पुढील 15 दिवसांत 1300 बेड असणारं एक तात्पुरतं रुग्णालय बनवलं जाईल. 1000 बेड असणारं एक रुग्णालय सध्या बनवलं जात आहे. त्याचं कामही 10 दिवसात पूर्ण केलं जाईल.