‘कोरोना’ कनेक्शनमुळं कॅलिफोर्नियाच्या मार्केटमध्ये एकाच रात्रीतून विकली गेली ‘एव्हरक्लेअर’ !

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनापासून बचावासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातून एक आश्चर्यचकित करणारी गोष्ट समोर आली आहे. तेथील लोक एव्हरक्लेअर नावाचे ड्रिंकचा अधिक प्रमाणावर साथ करत आहेत. कोरोनामुळे कॅलिफोर्नियामध्ये या ड्रिंकची मागणी अधिक वाढली आहे. एवढेच नाही, तर या ड्रिंकवर गाणेही तयार होत आहे.

काही दिवसांपूर्वी या ड्रिंकची मागणी इतकी वाढली होती की, सरकारने 11 राज्यांमध्ये ते अवैध घोषित केले. कोरोना काळात लोकांनी याचा वापर पिण्यासह सॅनिटायझर आणि इतर जंतूनाशक म्हणून पर्याय वापरायला सुरुवात केली होती.

कोरोनाचा फैलाव सुरू झाल्यापासून सॅनिटायझरच्या वापरावर अधिक भर दिला जातोय. त्यामुळे या ड्रिंकची मागणीही अधिक वाढली आहे. एव्हरक्लेयरमध्ये अशा प्रकारचे जंतू मारण्याची शक्ती असल्याचेही समोर आले आहे. याचा वापर पिण्यासह जंतूनाशक म्हणूनही केला जाऊ शकतो. हे ड्रिंक फरशीवर टाकून फरशीही स्वच्छ करतात. डब्ल्यूएचओने अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरायला सांगितले असून त्यासाठी एव्हरक्लेअर हा योग्य पर्यंत आहे. जे घटक सॅनिटायझरमध्ये असतात ते सर्व घटक एव्हरक्लेअरमध्ये आहेत. त्यामुळे अधिक लोक याच्या बाटल्या घेऊन त्याचा साठा करत आहेत.

तेथील ‘लॉस एंजल्स टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, एका आठवड्यात एव्हरक्लेअरच्या दोन-तीन बाटल्याच विकल्या जात होत्या. मात्र, आता लोक भरपूर विकत घेत आहेत. त्यामुळे दुकानदाराला त्यांच्या दुकानावर, एका व्यक्तीला दोनच बाटल्या मिळतील, असे लिहावे लागले. यानतंर या बाटल्यांच्या विक्रीला आळा बसू शकला. लोक एव्हरक्लेअरचा वापर केवळ हात स्वच्छ करण्यासाठीच नाही, तर फळे, फरशी आणि घरातील इतर वस्तूदेखील धुण्यासाठी करत असल्याचे समोर आले.