पुण्याला ‘कोरोना’मुक्त शहर बनवू या : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळून आले. लोकांनी काळजी न घेतल्याने पाहता पाहता शहर कोरोनाचे हॉटस्पॉट बनले होेते. त्यामुळे सर्व सण -उत्सव साधेपणाने साजरे करण्याची वेळ आपल्यावर आली. पण परिस्थिती सुधारत असून पुरेशी दक्षता घेऊन पुण्याला देशातील पहिले कोरोनामुक्त शहर करू, त्यासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.

स्वारगेट येथील पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मुख्यालयात माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होेते. पवार म्हणाले की, राज्यात पहिला कोरोनाचा रुग्ण पुण्यात आढळला.कोरोनाचा धोका अद्यापही टळलेला नाही. जनतेने पुरेशी काळजी घेतली तर यश मिळेल. अद्यापही अनेकजण विनामास्क फिरत आहेत. मास्कच्या कारवाईत जिल्ह्यात साडेबारा लाखांचा दंड वसूल केला आहे. याकडे दुर्लक्ष करू नका, याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागले. दुसरी लाट डिसेंबर जानेवारीत आली तरी आपण तयारी केली असल्याचे ते म्हणाले. जनजागृतीवर अधिक भर देणे अधिक गरजेचे असल्याचे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

तर कोरोना जनजागृतीसाठी पीएमपीएमएल तत्पर असल्याचे जगताप यांनी सांगितले यावेळी खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर, सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीएमएलचे अध्यक्ष राजेंद्र जगताप आदी यावेळी उपस्थित होते.

बसमध्ये जनजागृृतीचे संदेश, कर्मचा-यांना शपथ कार्यक्रमापूर्वी पवार यांनी पीएमपीएमच्या बसची पाहणी करून अभियानाची सुरुवात केली. या अभियानाअंतर्गत कोरोना विषयी जनजागृती करणारे 500 बसेस व स्थानकावर संदेश लावले जाणार आहेत. त्याचे अनावरण पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कर्मचा-यांना कोरोना जनजागृतीची शपथ देण्यात आली.