Coronavirus : नोटांव्दारे ‘कोरोना’ पसरण्याची ‘शंका’, चीननं बचावासाठी अवलंबली ‘ही’ पध्दत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधील वुहान शहरातून कोरोना व्हायरस या प्राणघातक विषाणूमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून आता ते सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

तपासणी दरम्यान असे लक्षात आले कि कॅशमध्ये वापरलेली नोट देखील कोरोना विषाणूचा वाहक असू शकते. यामुळे आता चीनने भविष्यात अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी व्हर्च्युअल मनी सिस्टम अवलंबण्यावर जोर दिला आहे आणि त्याची चाचणी घेत आहे.

चीनने हे पाऊल चलनातून किंवा नोटांमधून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उचलले आहे. अशी डिजिटल चलने धोका रोखण्यास मदत करतात. मागच्या फेब्रुवारीमध्ये चीनने कोरोना विषाणूमुळे प्रभावित हॉटस्पॉट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोटा वापरणे सोडून दिले होते. एवढेच नव्हे तर काही चलने गोदामांमध्ये तात्पुरती ठेवली होती. रोगाचा फैलाव रोखण्यासाठी हे पाऊल उचलले गेले होते.

चीन कोरोना व्हायरसच्या संकटात आपल्या चार शहरांमध्ये डिजिटल चलनाची चाचणी घेत आहे. या माध्यमातून लोकांना कोणत्याही कॅशची गरज भासणार नाही.

हा पायलट प्रोजेक्ट चीनची डिजिटल करन्सी रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पीपल्स अँड बँक ऑफ चायना चालवत आहे. हा चीनच्या अधिकृत डिजिटल चलनावर संशोधन आणि विकासाचा एक भाग आहे. अधिकृत डिजिटल चलनाचा वापर बीजिंगमध्ये २०२२ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान देखील केला जाईल.