Corona Lockdown 2.0 : घराबाहेर पाऊल टाकताना नक्की लक्षात ठेवा ‘या’ 15 गोष्टी, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळे सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली असून आता गृह मंत्रालयाने याबाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जे तातडीच्या कामासाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीत घराबाहेर जात आहेत त्यांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

सार्वजनिक ठिकाणी लक्षात ठेवा या १५ गोष्टी –

१. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी मास्क ना लावता जाऊ नये.
२. आरोग्य मंत्रालय आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून जारी केलेल्या गाइडलाइन्स अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी किंवा कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन काटेकोरपणे करावे.
३. लग्न, समारंभ किंवा अंत्य संस्कार सारख्या कार्यक्रमांवर अंतिम निर्णय जिल्हा दंडाधिकाऱ्यांचा असेल.
४. कोणत्याही ठिकाणी ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी जमा होऊ नये. असे केल्यास कायदेशीर कारवाई होईल.
५. सार्वजनिक ठिकाणी थुकणाऱ्यांना भारी दंड द्यावा लागेल.
६. दारू, गुटखा आणि तंबाखू सारख्या मादक पदार्थांची विक्री केल्यास दंड बसेल. सोबतच ते खाऊन थुकणाऱ्यांवर देखील कारवाई होणार आहे.
७. कामाच्या ठिकाणी खबरदारी घेत शरीराचे तापमान तपासावे. सोबतच सुविधेसाठी उपलब्ध केलेल्या सॅनिटायझरचा वापर करावा.
८. वर्कप्लेसवर शिफ्ट दरम्यान मिळणाऱ्या एका तासाच्या लंच ब्रेकमध्ये सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे.
९. ६० पेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना जर कोणता आजार असेल किंवा ज्यांच्या घरी ५ वर्षापेक्षा कमी वयाची मुले आहेत ते घरी राहून वर्क फ्रॉम करू शकतात.
१०. सरकारी किंवा खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याने फोनमध्ये आरोग्य सेतू ऍप डाउनलोड करावा.
११. सगळ्या संस्थांनी शिफ्ट्स दरम्यान आपल्या इथे सॅनिटायझरची पर्याप्त सुविधा दिली पाहिजे.
१२. ग्रुपसह मिटिंग करण्यावर बंदी असेल.
१३. परिसरात साफ-सफाईकडे विशेष लक्ष दिले पाहिजे आणि नियमितपणे हात धुतले पाहिजेत.
१४. शिफ्ट्स ओव्हरलॅप करू नका आणि कॅन्टीनमध्ये लंच दरम्यान सोशल डिस्टंसिंगचे नियम तोडू नका.
१५. कमर्चाऱ्यांना अंतर ठेवून बोलणे आणि स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याची ट्रेनिंग द्यावी.