वाढणार लॉकडाउन ! स्कूल-कॉलेज, धार्मिक कार्यक्रमांवर पूर्णपणे ‘बंदी’ घालण्याचा प्रस्ताव, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकारने 21 दिवसांचा लॉकडाउन लागू केला आहे. 14 एप्रिल रोजी संपणाऱ्या लॉकडाउनला अजून एक आठवडा शिल्लक आहे, पण लोकांच्या मनात हा प्रश्न आहे की लॉकडाउन वाढविण्यात येईल की 14 एप्रिलपर्यंत राहील. दरम्यान, लॉकडाउन पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकार व तज्ज्ञांनी केंद्र सरकारला आवाहन केले आहे. यावर केंद्र सरकार विचार करत आहे.

सध्या तरी सुत्रांच्या म्हणण्यानुसार शाळा व धार्मिक कार्यक्रमांवरील पूर्ण बंदी जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या बदल्याही 6 महिन्यासाठी तहकूब होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकार राज्यांच्या मागणीचा विचार करीत आहे
सरकारमधील उच्चस्तरीय सूत्रांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले की, अनेक राज्य सरकारे आणि तज्ञांनी केंद्र सरकारला लॉकडाऊन पुढे करण्याचे आवाहन केले आहे. यावर केंद्र सरकार विचार करत आहे. पंतप्रधानांनी गठित केलेल्या उच्चस्तरीय समित्यांना कित्येक राज्यांनी आपले प्रतिसाद पाठविले आहेत. त्या राज्यांनी लॉकडाउन वाढविण्याची शिफारस केली आहे.

लॉकडाउन जूनपर्यंत सुरू राहील का?
राज्यांकडून प्राप्त झालेल्या अभिप्रायात सर्व प्रकारच्या धार्मिक उपक्रमांवर पूर्ण बंदी घालणे हे देखील समाविष्ट आहे. ही बंदी सर्व धर्मासाठी लागू आहे आणि त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शिथिलता नसावी असे राज्यांचे म्हणणे आहे. राज्यांचे असेही म्हणणे आहे की शाळा व महाविद्यालये देखील जूनपर्यंत बंद करावी लागतील. तसेच सरकारी क्षेत्रातील सर्व बदल्या व पोस्टिंग सहा महिन्यांकरिता पुढे ढकलण्यात येणार आहेत. तसेच परिस्थिती सुधारल्याशिवाय हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार लॉकडाउन अंतर्गत पूर्णपणे बंद ठेवली जातील. जोपर्यंत परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत विवाहसोहळे, अंत्यसंस्कार, कॉर्पोरेट टाऊन हॉलच्या सभा यासारखे सार्वजनिक कार्यांना लॉकडाउन अंतर्गत बंद केले पाहिजे, असेही राज्यांचे म्हणणे आहे.

दोन आठवडे वाढवण्याचे आवाहन
महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्लीसह अनेक राज्यात अचानक रुग्णांची संख्या वाढली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केंद्र सरकारला सूचना दिली होती की आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाउन वाढवावे. केसीआरने सुचविलेल्या अहवालाच्या आधारे 2 जूनपर्यंत लॉकडाऊन लागू करण्याचे आवाहन करण्यात आले.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च रोजी 21 दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन जाहीर केला जो 14 एप्रिल रोजी संपत आहे. त्याच वेळी, कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या तीन दिवसात कोरोनाची एक हजाराहून अधिक प्रकरणे झाली असून दोन डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या भारतात कोरोनाचे 4481 रुग्ण आहेत, त्यापैकी 114 लोकांचा मृत्यू झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like