दुर्देवी ! ‘कोरोना’ग्रस्त आई मोजत होती अखेरच्या घटका, मुलगा रोज खिडकीतून फक्त पहायचा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूमुळे एका मुलाची आपल्या आईपासून वेगळे होण्याची ही वेदनादायक कथा आपल्या डोळ्यात देखील अश्रू आणेल. वास्तविक, कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर फलस्तीनमधील एका रुग्णालयात एका महिलेवर उपचार सुरू होते. जेव्हा महिलेच्या मुलाला तिच्या जवळ जाऊ दिले नाही तेव्हा मुलगा दररोज रुग्णालयाच्या खिडकीवर चढत असे आणि आजारी आईकडे टक लावून पाहत असे.

जोपर्यंत ती महिला जिवंत होती तोपर्यंत हे असेच चालू राहिले आणि मुलगा दररोज खिडकीजवळ बसून आपल्या आईला तासन्तास पाहत असे. रुग्णालयाच्या खोलीच्या खिडकीजवळ बसून आपल्या आईकडे पाहत असलेला मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्थानिक वृत्त वेबसाइट अल नासच्या मते, बीट आवा शहरातील फलस्तीन तरुणाने जिहाद अल-सुवती हेब्रोन हॉस्पिटलच्या आयसीयूच्या खिडकीवर चढून आपल्या आईला अलविदा केले, जिथे त्या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्यावर उपचार सुरू होते.

फलस्तीनमध्ये 73 वर्षीय वृद्ध महिला रश्मी सुवित्ती यांचे चार दिवसांपूर्वी गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. आईला पाहण्यासाठी रुग्णालयाच्या खिडकीवर चढलेल्या मुलाचा कोणीतरी फोटो काढला, जो नंतर व्हायरल झाला. मोहम्मद साफ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. संसर्ग होण्याचा धोका टाळण्यासाठी संक्रमित रुग्णांना इतरांपासून दूर ठेवले जाते. कोरोना विषाणूमुळे जगभरात सुमारे दीड कोटी लोकांना संसर्ग झाला आहे, तर लाखो लोकांनी आपला जीव गमवला आहे.