धक्कादायक ! चीनमध्ये नव्हे तर युरोपात होता ‘कोरोना’चा पहिला रूग्ण, नोव्हेंबरमध्ये पहिली केस समोर आल्याचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील ६४ लाखांच्या आसपास लोकांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. तर ३ लाख ७७ हजार जणांच्या वरती रुग्णांचा मृत्यू या संसर्गामुळे झाला आहे. कोरोनाचा विषाणू चीनच्या वुहान मधून जगभरात पसरल्याचा आरोप चीनवरती सतत केला जातो. मात्र, आता युरोपमध्ये या विषाणूचा पहिला रुग्ण १६ नोव्हेंबर २०१९ च्या दरम्यान समोर आला होता. असा धक्कादायक दावा फ्रान्समधील वैज्ञानिकांच्या एका समितीने केला आहे. याबाबत इशान्य फ्रान्समधील एका रुग्णालयाने नोव्हेंबर ते डिसेंबर या काळातील रुग्णालयात येणाऱ्या फ्लूशी संबंधित जवळपास २,५०० हुन अधिक नागरिकांच्या एक्स-रे रिपोर्टचा अभ्यास केला. यामधील केवळ नोव्हेंबर महिन्यातीलच दोन एक्सरे रिपोर्टमध्ये कोरोना संसर्गाची स्पष्टपणे पुष्टी झाली आहे. पण, तेव्हा डॉक्टरांना याबाबतची संपूर्ण माहिती नव्हती.

इशान्य फ्रान्सच्या कॉलमार येथील अल्बर्ट श्वित्झर रुग्णालयाचे डॉक्टर मायकल श्मिट यांच्या समितीने दावा केला आहे की, कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण चीनमध्ये समोर आला नसेल. कारण कोरोनाचा संसर्ग नोव्हेंबर च्या मध्यातच युरोपात आलेला. डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार, या रुग्णालयात १६ नोव्हेंबरला एका रुग्णाचा एक्सरे काढण्यात आला होता. या रुग्णाच्या अहवालातून स्पष्ट झालं होत की, तो कोरोना संसर्गित रुग्ण आहे. तसेच या रुग्णावर दुसऱ्या दिवशीही चाचणी करण्यात आली. तेव्हा देखील या रुग्णात कोरोना संसर्गाची लक्षणे दिसून आली. फ्रान्सने २४ जानेवारीला देशात पहिला कोरोना संसर्गित रुग्ण आढळल्याची पुष्टी केली होती. परंतु, या समितीने केलेल्या दाव्यानुसार, येथे पहिला रुग्ण १६ नोव्हेंबरलाच समोर आला होता.

डॉक्टर मायकल श्मिट यांनी सांगितल्यानुसार, केवळ फ्रान्सच नव्हे, तर युरोपातील अधिकांश देशात आणि अमेरिकेतही, अशी प्रकरण समोर आली होती. ज्यास ‘केस झिरो’ मानलं जात होत. तो मुळात झिरो पेशन्ट नव्हताच आणि त्यामुळे अनेक रुग्ण ट्रॅक झाले नाही आणि न कळताच कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. या समितीने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात झालेल्या एक्सरेचा अभ्यास केल्यानंतर निदर्शनास आलं की, यामध्ये एकूण १२ जण असे होते, ज्यांना कोरोना संसर्गाची लागण झाली होती. त्यांच्यात या संसर्गाची लक्षण स्पष्टपणे दिसत होती.

युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंगटनच्या ग्लोबल हेल्थ एक्सपर्टस आणि पल्मोनोलॉजिस्ट डॉक्टर विना गुप्ता यांनीही या दाव्यांचा आणि एक्सरे रिपोर्टचा अभ्यास केला. त्यांच्या मते एक्सरेमध्ये दिसत असलेल्या फुफ्फुसात असा बदल दिसून येत आहे, जसा कोरोना संसर्गामुळे होतो. पण सर्वच एक्सरेमध्ये हा बदल आढळला नाही. ही समिती आता ऑक्टोबरमध्ये करण्यात आलेल्या एक्सरेचा सुद्धा अभ्यास करत आहे. ज्यामुळे खऱ्या झिरो रुग्णापर्यंत पोहचता येईल. डॉक्टर मायकल श्मिट यांनी एनबीसीसोबत बोलताना म्हटलं, जोपर्यंत आपण पहिल्या रुग्णापर्यंत पोहचत नाही. तोपर्यंत आपण या विषाणूच्या एक पाऊल मागेच राहू. आपल्याला हे कळूच शकणार नाही, की हा कोठून आला आणि याला कसे थांबवावं. जर आमचा दावा खरा असेल, तर तो देशांची कोरोना संसर्गाविरोधातील असेलेली नीतीच पूर्णपणे बदलून टाकेल.

याआधी फ्रान्सच्या डॉक्टर युव्स कोहेन यांनी असा दावा केला की, पॅरिसच्या इले-द-फ्रान्स रुग्णालयातही २७ डिसेंबरला कोरोना संसर्गाच्या पहिल्या रुग्णाची पुष्टी झालेली. डॉक्टर कोहेन यांच्या समितीने डिसेंबर आणि नोव्हेंबरच्या २४ रुग्णांच्या रिपोर्टचा अभ्यास केला होता. त्यात त्यांना या संसर्गाची लक्षणे दिसून आली होती. दरम्यान, चीनमध्ये कोरोना संसर्गाचा पहिला रुग्ण १७ नोव्हेंबर रोजी आढळून आला होता. साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट च्या वृत्तानुसार, सरकारी दस्तऐवजांमध्ये त्या रुग्णाचे नाव नोंदवण्यात आलं होते. चीन प्रशासनाने, असे २६६ संभाव्य कोरोना संसर्ग झालेले रुग्ण शोधले आहे. ज्यांना हा आजार गेल्या वर्षी झाला होता. डिसेंबर अखेरीस चीनच्या डॉक्टरांना समजले की, हा नव्या प्रकारचा आजार आहे. तर हुबेई प्रांतातील एका रुग्णालयाचे डॉक्टर झांग जिक्सियन यांनी २७ डिसेंबर रोजी पहिल्यांदाच चीन प्रशासनास सांगितलं की, एका नव्या प्रकारचा कोरोना संसर्ग पसरत आहे. तोपर्यंत जवळपास १८० रुग्ण समोर आले होते. त्यानंतर ३१ डिसेंबरला चीनने कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्याची अधिकृत घोषणा केली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like