Coronavirus : ‘कोरोना’चा सामना करणार्‍या प्रत्येक ‘वॉरियर्स’ला मिळणार 50 लाखाच्या विम्याचं सुरक्षा कवच, सरकारची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. याचा सर्वात मोठा फटका मजुरीवर काम करणाऱ्यांना, हातावर पोट असणाऱ्यांना बसत आहे. या सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने अत्यंत मोठे पाऊल उचलले आहे. सरकारकडून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1 लाख 70 हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. ज्याअंतर्गत या कोरोनाच्या संकटादरम्यान गरिबांना सहायत्ता मिळेल.

याशिवाय कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी कोरोना वॉरियर्सला 50 लाख रुपयांच्या मेडिकल इंश्योरेंसची घोषणा देखील मोदी सरकारकडून करण्यात आली. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज पत्रकार परिषद घेत या योजनांची घोषणा केली. कोरोनाशी लढा देण्यासाठी या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत 1 लाख 70 हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात येत आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की आशा कार्यकर्त्या, स्वच्छता कर्मचारी, मेडिकल आणि पॅरा मेडिकल स्टाफसाठी 50 लाख रुपयांचे विमा संरक्षणाची घोषणा करण्यात येत आहे. याचा फायदा 20 लाख मेडिकल स्टाफ आणि कोरोना व्हायरसशी लढणाऱ्यांना (वॉरियर्स) होईल.