Coronavirus : शरीरात ‘ही’ 8 लक्षण दिसली तर समजून जा तुम्हाला ‘उपचाराची’आवश्यकता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरसचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या व्हायरसची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक चाचणी करणे आवश्यक असल्याचे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे. या रोगाची लक्षणे बऱ्याच लोकांमध्ये उशिराने दिसून येतात. दुसरे म्हणजे, याची लक्षणे सर्वसाधारण सर्दी आणि खोकला सारखी असल्याने कोरोनाची लक्षण असल्याचे समजणे कठीण जाते. शरिरात कोणतेही प्रमुख लक्षण दिसता आपण त्वरीत डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत.

1. अमेरिकन संशोधक आणि जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रसिद्ध केलेल्या अहवालात असे म्हटले आहे की, कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर कोरडा खोकला येणे सुरु होते. जर आपल्याला अशी समस्या येत असेल तर त्वरीत डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे.

2. रुग्णांमध्ये बंद नाक किंवा नाकातून पाणी येण्याची लक्षणे दिसून आली आहेत. परंतु नाकातून पाणी येणे हे कोरोनाचे लक्षण होऊ शकत नाही. एलर्जी किंवा सर्दीमुळे नाकातून पाणी येऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार कोरनामध्ये पाच टक्क्यापेक्षा कमी रुग्णांना ही लक्षणे दिसतात.

3. रुग्णाला जास्त ताप येऊ लागतो आणि त्याच्या शरीराचे तापमान खूप वाढते. आतापर्यंत अनेक आरोग्य तज्ञांनी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरिरात उच्च ताप असतो असा दावा केला आहे.

4. एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं असतील तर त्या व्यक्तीला पहिल्या पाच दिवसांत श्वास घेण्यास त्रास होण्यात सुरुवात होते. एका अहवालात असा दावा केला आहे की, फुफ्फुसात कफ साठल्याने श्वास घेण्यास त्रास होतो.

5. स्नायू दुखणे किंवा थंडी वाजून येणे ही देखील कोरोनाची लक्षणं असू शकतात. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार 11 टक्के लोकांना सर्दी होण्याची लक्षणे जाणवतात आणि 14 टक्के लोकांची स्नायू दुखतात. ही गंभीर लक्षणं उद्भवण्याची चिन्ह असू शकतात.

6. लॅन्सेट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, चीनमध्ये कोरोना विषाणूची लागण झालेल्या 3 टक्के लोकांनाच अतिसार झाला होता. त्याचवेळी जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार चीनमधील कोरोना विषाणूची लागण झालेल्या 5 टक्के रुग्णांना मळमळ होण्याची समस्या होती.

7. अमेरिकेच्या वॉशिंग्टन नर्सिंग होमच्या नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, सुमारे एक तृतीयांश लोकांमध्ये कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह होती. परंतु निम्या लोकांमध्ये कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. काही रुग्णांमध्ये अस्वस्थता आणि उठण्या-बसण्याची अडचण येणे अशी लक्षण होती.

8. कोरोना विषाणूच्या काही रुग्णांमध्ये शिंका येणे आणि घसा खवखवल्यासारख्या समस्या दिसून आल्या आहेत. परंतु शिंकणे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कोरोना झाला आहे. शिंका येणे आणि घसा खवखवणे हे अ‍ॅलर्जी किंवा सर्दीमुळे उद्भवते.

कसा कराल स्वत:चा बचाव ?
जर तुम्हाला अशा लक्षणांपैकी कोणतेही एक लक्षण दिसून येत असेल तर आतापासून स्वत:ला क्वारंटाईन करा. विश्रांती घ्या आणि भरपूर द्रवपदार्थ खा. तसेच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून त्यांना लक्षणासंबंधी माहिती द्या. डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचे आणि सांगितलेल्या नियमांचे पालन करा.