पंकजा मुंडेंचं भावनिक उद्धार; म्हणाल्या – ‘माझा वाघ भाऊ हो…या दृष्ट Corona नं टिपला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढला आहे. अशा संकटात अनेक लोकांचा जीव गेला आहे. तर भाजप नेत्या पकंजा मुंडे यांचे बॉडीगार्ड गोविंद यांचा उपचारादरम्यान कोरोनाने मृत्यू झाला. गोविंद यांच्या मृत्युने पंकजा यांना मोठे दु:ख झाले आहे. तर वाघ माझा भाऊ हो, माझा बॉडीगार्ड गोविंद या दृष्ट कोरोनाने टिपला असे यामुळे पंकजा मुंडे यांनी गोविंद यांचा मृत्यू अतिशय धक्कादायक बाब असल्याच त्यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.

तसेच पकंजा मुंडे यांनी भावनिक आणि दुःख व्यक्त करता गोविंद यांच्यासमवेतच्या आठवणींचा एक व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर केला आहे. तर, गोविंद, एक जागा कायमची रिकामा झाली, असे भावनिक उद्गार या व्हिडिओत व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे राखी पौर्णिमेला पंकजा मुंडे, गोविंद यांच्याकडून राखीही बांधून घेत असत. म्हणून, गोविंद यांच्या मृत्युने पंकजा यांना मोठे दु:ख अनावर झालं आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी रामायण बघतेय लक्ष्मण मूर्छित झाल्यावर स्वतः श्रीराम ही भावूक झाले, युद्ध सोडून दुःखात बुडाले. मी तर सामान्य माणूस, कार्यकर्ते, स्टाफ माझ्यासाठी तेच स्थान ठेवतात. ते माझा परिवार आहेत. माझा अंगरक्षक गोविंद माझा भाऊ कोरोनाने गंभीर आहे, अस्वस्थता सांगण्यासाठी शब्द नाहीत, कृपया प्रार्थना करा, असे ट्विट त्यांनी केले होते.