Coronavirus : ‘कोरोना’विरूध्द लढण्यासाठी पुण्यातील ‘या’ महिला सरपंचानं अवलंबली ‘भन्नाट’ पध्दत, PM मोदी देखील झाले ‘आश्चर्यचकित’ !

पुणे, पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना संसर्गाविरोधात सुरू असलेल्या लढाईमध्ये देशभरातील ग्रामीण भागातून सुखद आणि कौतुकास्पद चित्र समोर येत आहेत. ग्रामस्थ सोशल डिस्टेंसिंग आणि क्वारंटाईनचे अनुसरण करीत आहेत, आणि ते कोरोना संक्रमणापासून आपल्या गावाचे संरक्षण करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले पाहिजे. अशाच एका अर्थपूर्ण उपक्रमाने मोदीही प्रभावित झाले आहेत. पंतप्रधान मोदींनी पुणे जिल्ह्यातील मेदनकरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियंका रामदास मेदनकर यांचे कौतुक केले आहे. पंचायती राज दिनी त्यांनी पंतप्रधानांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 6 मिनिटे संवाद साधला. यादरम्यान, त्यांनी आपल्या गावात सोशल डिस्टेंसिंगचे आणि क्वारंटाईनचे कसे अनुसरण केले जाते हे सांगितले. याबद्दल जाणून मोदी प्रभावित झाले आहेत.

पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सरपंच प्रियंका यांचे सुमारे 6 मिनिटे संभाषण ऐकले. यादरम्यान प्रियंका यांनी मोदींना एक कविताही ऐकवली. तसे, प्रियंका या भारतीय जनता युवा मोर्चाशी नेहमी जोडलेल्या असतात. 32 वर्षीय प्रियंका यांची चर्चा ऐकल्यानंतर मोदी म्हणाले की खेड्यापाड्यात व्यवस्था राबविण्यासाठी अशा सुशिक्षित सरपंचांची गरज आहे. प्रियंका यांनी एका माध्यमांशी चर्चा करताना सांगितले की, जेव्हा पंचायती राज दिनाच्या दिवशी आपण पंतप्रधानांशी बोलणार आहोत हे समजले तेव्हा त्यांना रात्रभर झोप आली नाही.

प्रियांका आणि त्यांचे पती सुदर्शन चौधरी हे सुरुवातीपासूनच मोदींचे चाहते आहेत. प्रियांका यांनी मोदींना सांगितले की, जेव्हा मार्चमध्ये लॉकडाउन लागू झाले तेव्हापासून त्यांनी आपल्या गावाच्या सुरक्षेची वेगवेगळी पावले उचलली. सुरुवातीलाच संपूर्ण गावात 8 दिवसासाठी कडक लॉकडाउन करण्यात आले होते. गाव सोडियम डायपोक्लोराईडने सॅनिटाईझ करण्यात आले होते. तसेच, गावात दोन ठिकाणी सॅनिटायझेशन टनल बसविण्यात आले. मास्क तयार करण्यासाठी एका संस्थेशी जुडले. ग्रामस्थांनीही या संसर्गाच्या तीव्रतेस समजून संरक्षणासाठी त्यांची साथ दिली.

प्रियंका म्हणाल्या की संसर्ग रोखण्यासाठी ग्रामस्थांना मॉर्निंग आणि इव्हनिंग वॉक करण्यास प्रतिबंधित करण्यात आले. संध्याकाळी गावातील पथदिवे लवकरच बंद करण्यात येत होते. प्रियांका यांनी सांगितले की त्या स्वत: लाउडस्पीकरने खेड्यात फिरत होत्या आणि लोकांना जागरूक करत होत्या.