Corona Virus : धक्कादायक ! जपानमध्ये आणखी एका भारतीयाला ‘कोराना’ची ‘लागण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. जपानमध्ये योकोहमा बंदरावर उभ्या असलेल्या डायमंड प्रिन्सेस क्रुझवरील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या क्रुझवर असलेल्या आणखी एका भारतीय नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

भारतीय दूतावासाने या बाबत माहिती दिल्याचे वृत्त आहे. या क्रुझवर एकूण 138 भारतीय नागरिक आहेत. यात 132 कर्मचारी अधिकारी, तर सहा प्रवासी आहेत. भारतीय नागरिकांसह 218 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. या सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या क्रुझवरील हे तीन रुग्ण वगळता अन्य कोणाही भारतीयाला कोरोनाची लागण झाली नाही. क्रुझवरील भारतीय नागरिकांसोबत दूतावास ई मेल, टेलिफॉन कॉलच्या माध्यमातून संपर्कात आहे.

योकोहामा बंदरावर एक आठवड्यापासून डायमंड प्रिन्सेस नावाची क्रूझ उभी होती. आज अखेर या क्रूझवरील 80 वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या प्रवाशांना क्रूझ बाहेर येण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये कोरोना संसर्ग न झालेल्या प्रवाशांना ही संधी देण्यात आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 जण क्रूझवरुन बाहेर पडले आहेत परंतु शुक्रवारी आणखी प्रवाशी बाहेर येतील का याबाबत काहीही माहिती देण्यास नकार देण्यात आला आहे.

कोरोना व्हायरसने जपानमध्ये पहिला बळी घेतला आहे. जपानचे आरोग्यमंत्री कात्सुनोबू कातो यांनी याबाबत माहिती दिली. या क्रूझमधून एका 80 वर्षीय महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला.या महिलेच्या वैद्यकीय चाचणीत तिला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. अहवाल येण्यापूर्वी या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला टोकियो जवळील एका शहरात वास्तव्यास होती. जपान शिवाय, हॉंगकाँग आणि फिलिपिन्समधील प्रत्येकी एका नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

You might also like